Pune News | केएसबी पंप ने कृषी आणि घरगुती पंपांची नवीन श्रेणी केली लॉन्च

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | केएसबी पंपांचे (KSB Pumps) अधिकृत वितरक महावीर एंटरप्रायझेस (सचिन चंगेडिया) यांनी हॉटेल प्राईड मध्ये असोसिएट डीलर्स कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. या परिषदेचा मुख्य उद्देश कंपनी आणि त्यांच्या कृषी व घरगुती पंपांविषयी सविस्तर माहिती देणे हा होता.(Pune News)

केएसबी पंप कंपनीच्या वेस्ट जोनचे जनरल मैनेजर ई. किशोर म्हणाले की, आज आम्ही जगभरातील १५० हून अधिक देशांमध्ये व्यवसाय करत आहोत, पण आमचा उद्देश चॅनल पाटनर्स द्वारे आमच्या प्रत्येक ग्राहकाच्या गरजा समजून घेणे आणि त्यांच्या समस्या सोडवणे हा आहे. केएसबीची सुरुवात १८७१ मध्ये जर्मनीमध्ये झाली आणि कंपनीला १५० हून अधिक वर्षे यशस्वी झाली आहेत. आमच्या ग्राहकांच्या नवीन गरजा पूर्ण करण्यासाठी, आमचा रिसर्च सेंटर आणि विकास विभाग दररोज नवीन शोध लावण्यासाठी नेहमीच तयार असतो.

ते पुढे म्हणाले की देशांतर्गत पंपांच्या मालिकेत, २ एचपी सिंगल फेस ओपन वेल सबमर्सिबल आणि १ एचपी , १.५ एचपी आणि २ एचपी थ्री फेस ओपन वेल सबमर्सिबल तसेच १ एचपी १.५ एचपी आणि २ एचपी ३ फेस सेंट्रीफ्यूगल मोनोब्लॉकचा लाँच केला आहे त्याचा वापर केला कारंजे, बागकामात सिंचन आणि घरांमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यासाठी केला जातो.

परिषदेत कंपनीच्या उत्पादनांची माहिती उपव्यवस्थापक श्री श्रीकांत माडेकर यांनी दिली तसेच १० डीलर्सना त्यांच्या
उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रोत्साहन देण्यात आले व त्यांचा कंपनीच्या उच्च व्यवस्थापनाच्या वतीने गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान कंपनीने कृषी आणि घरगुती पंपांची नवीन श्रेणी देखील लॉन्च केली.
या समारंभात केएसबी पंप कंपनीचे रीजनल मैनेजर अभिषेक त्रिपाठी, एरिया सेल्स इंजीनियर ओंकार कुलकर्णी,
महावीर एंटरप्रायझेसचे सचिन चंगेडिया आणि ललित लुनिया जी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar-Bhushan Singh Holkar | शरद पवारांचे बेरजेचे राजकारण सुरूच, अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर राष्ट्रवादी प्रवेश करणार

Keshav Nagar Mundhwa Crime | पुणे : प्रेम संबंधामध्ये दुरावा, तरुणीला शिवीगाळ करुन मारहाण

Aba Bagul Meets Devendra Fadnavis | काँग्रेसच्या आबा बागुल यांचे मुलांच्या राजकीय पुनर्वसनाचे प्रयत्न दोन वर्षांनी प्रत्यक्षात ! बागुल यांनी घेतली फडणवीस, बावनकुळे यांची भेट