Pimpri Chinchwad Cheating Fraud Case | पिंपरी : स्वस्तात सिमेंट देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला दोन लाखांचा गंडा

ADV

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Cheating Fraud Case | अल्ट्राटेक कंपनीचे सिमेंट स्वस्तात देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाला दोन लाख 17 हजार रुपयांना फसवल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार 2 मार्च ते 3 मार्च या कालावधीत पिंपरी चिंचवड महापालिका Pimpri Chinchwad Municipal Corporation (PMC) इमारतीच्या समोर घडला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police) एका व्यक्तीवर फसवणुकीचा (Cheating Fraud Case) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत महेश अर्जुनदास बक्षाणी (वय-50 रा. कोहिनुर वयोना सोसायटी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कल्याण (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pimpri Chinchwad Cheating Fraud Case)

ADV

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महेश बक्षाणी यांना फोन करुन सदगुरु टेड्रर्स सांगली येथून बोलत असल्याचे सांगितले.
अल्ट्राटेक कंपनीचे सिमेंट स्वस्त दरात देतो, असे त्याने फिर्यादीस सांगितले.
त्यासाठी ऑर्डर घेऊन त्यांच्याकडून बिल देखील मागवून घेतले.
त्या बिलापोटी फिर्यादीकडून आरोपीने 2 लाख 17 हजार रुपये घेतले.
त्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारे सिमेंट न पाठवता तसेच घेतलेले पैसे परत न देता फसवणूक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डोंब करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amravati-Nagpur National Highway | धावत्या ट्रॅव्हल बसवर सिनेस्टाईल गोळीबार, ४ प्रवाशी जखमी, महाराष्ट्रातील महामार्गांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Uddhav Thackeray On Eknath Shinde | पक्ष फोडणे ही तुमचा नालायकपणा सिद्ध करणारी वृत्ती…, वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ठाकरेंचा हल्लाबोल!

Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi | तुम्ही आपआपले उमेदवार जाहीर करताय, हे तुम्हाला मान्य आहे का? वंचितने व्यक्त केली जाहीर नाराजी