Advt.

Pimpri Chinchwad corona | पिंपरी चिंचवडमध्ये एकाच सोसायटीत 43 जणांना ‘कोरोना’ची लागण, शहरात प्रचंड खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन पिंपरी चिंचवडच्या रहाटणी (rahatani) परिसरातील एकाच सोसायटीमध्ये मागील नऊ दिवसात 43 जणांना कोरोनाची (Pimpri Chinchwad corona) बाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने (PCMC) गृहप्रकल्पाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र (Restricted area) म्हणून घोषीत केला आहे. तसेच आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरु केल्या आहेत. कोरोना बाधित रुग्णांमध्ये काही लहान मुलाचां देखील समावेश आहे. मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Chinchwad corona) रुग्णांच्या संख्ये वाढ होत आहे.

रहाटणी परिसरात असलेल्या सोसायटीमध्ये 21 ऑगस्टपासून पॉझिटिव्ह रुग्ण (Positive patient) आढळून येत आहेत.
याठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांची दररोज टप्प्याटप्प्याने कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे.
यामध्ये दररोज 3 ते 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे.
27 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
तर रविवारी (दि.29) 175 संशयितांची तपासणी करण्यात आली.
यामध्ये 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
महापालिकेने तीन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे.
येथील रहिवाशांची दररोज कोरोना चाचणी केली जात आहे.

याबाबत पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे (Medical Officer Dr. Laxman Gofane) यांनी सांगितले, सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत.
कोरोनाचा संसर्ग होण्यामागची कारणे शोधली जात आहे.
पालिकेच्या वतीने पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे.

 

Web Title : Pimpri Chinchwad Corona | same housing project 43 people contracted coronary heart disease

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Neelam Rane | नारायण राणेंच्या अटकेच्या कारवाईवर पत्नी नीलम राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

WhatsApp आणणार ट्विटर, इन्स्टाग्राम आणि सिंगल अ‍ॅपसारखं खास फीचर !

CoWIN | औरंगाबादमध्ये कोविन अ‍ॅप हॅक? महापालिकेची पोलिसात तक्रार