Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2020 नवीन रुग्ण, 2471 जणांचा डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाली. रुग्ण वाढत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवीन रुग्णसंख्येत घट होत आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, मृतांची संख्या कमी होत नसल्याने चिंता कायम आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात कोरोनाचे 2020 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 65 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 2020 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 30 हजार 223 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2471 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 05 हजार 023 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 21 हजार 861 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये 8 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात येत आहे. आज दिवसभरात 1546 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 4 लाख 30 हजार 138 जणांना लस देण्यात आली आहे.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 65 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 41 रुग्ण शहरातील आहेत. तर 24 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5041 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 3339 तर हद्दीबाहेरील 1702 रुग्णांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या 2081 एवढी असून शहरातील 142 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आज मृत्यू झालेले रुग्ण निगडी, वाकड, पिंपळे गुरव, पिंपरी, चिंचवड, मोशी, काळेवाडी, कासारवाडी, भोसरी, पिंपळे सौदागर, चिखली, दिघी, पुनावळे, रुपीनगर, तळवडे, बोपखेल, कोंढवा, राजगुरुनगर, अहमदनगर, उमरज, खोपोली, पुणे, वडगाव, सनसवाडी, चाकण, देहूगांव, बालेवाडी, बाणेर, शिरुर, वडगांव, कामशेत, तळेगाव, नांदेड, औंध, चाकण येथील रहिवाशी आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आधी मृत्यू झालेल्या केसेस आज कळवण्यात आल्याने मृत्यूचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. गेल्या 24 तासात 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.