Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 846 नवीन रुग्ण, 2067 रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यात पुणे, मुंबई या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पुणे शहराला लागून असलेल्या आणि औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील कोरोना व्हायसरचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला. मागील दोन महिन्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली. मात्र, गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत वेगाने घट होत आहे. नवीन रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 876 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 59 मृत्यूंची नोंद झाली असून गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 846 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 42 हजार 580 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2067 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 22 हजार 326 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 16 हजार 561 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 59 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 43 रुग्ण शहरातील आहेत. तर 16 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 3693 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरामध्ये 8 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात येत आहे. आज दिवसभरात 1579 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 4 लाख 65 हजार 073 जणांना लस देण्यात आली आहे.