Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हे शाखेकडून गांजा, चरस जप्त, 21 लाखांचा मुद्देमालासह पाच जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी चिंचवडच्या सांगवी (Sangvi) परिसरात काही दिवसांपूर्वी दोन कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज (MD Drugs) जप्त करण्यात आले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांनी कारवाई करुन गांजा (Ganja), चरस (Charas), एल.एस.डी. डॉट पेपर (LSD Dot Paper) जप्त करुन पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 20 लाख 89 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि.17) सकाळी पावणे बाराच्या सुमारास सांगवी स्मशानभूमीजवळ असलेल्या एस.टी. कॉलनीच्या मैदानावर करण्यात आली.(Pimpri Chinchwad Crime Branch)

ओंकार उर्फ सोन्या महादेव लिंगे (वय 26), अनिकेत अनिल गोडांबे (वय 25), रोहन उत्तम कांबळे (वय 21), रुपेश गौतम जाधव (वय 21), रोहन उर्फ पप्या महादेव लिंगे (वय 24, सर्व रा. पी.डब्ल्यु.डी. कॉलनी, दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर विशाल उर्फ महाद्या गोरख कदम, सेनानी, हर्ष (रा. बाणेर), मयूर प्रवीण बाराथे (पूर्ण नावे माहिती नाहीत) यांच्या विरोधात एन.डी.पीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक विजय दिपक दौंडकर (वय-38) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी स्मशान भूमिजवळ असलेल्या एस.टी. कॉनलीच्या ग्राऊंडच्या कोपऱ्यामध्ये
अडोशाला काहीजण अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आले असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.
त्यानंतर पथकाने सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून तीन लाख 60 हजार रुपये किमतीचा 7
किलो 200 ग्रॅम गांजा, चार लाख 37 हजार 500 रुपये किमतीचे 175 ग्रॅम चरस, एक लाख 80 हजार रुपये किमतीचे 12
एलएसडी डॉट पेपर, सहा मोबाईल फोन, एक कार, तीन दुचाकी असा एकूण 20 लाख 89 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल
जप्त केला.

अटक केलेल्या आरोपींसोबत असलेला मयूर बाराथे हा पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला आहे.
अटक केलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता विशाल कदम याने गांजा आणून दिल्याचे सांगितले.
तर चरस त्यांनी स्वत: मध्य प्रदेश येथून सेनानी नावाच्या व्यक्तीकडून आणले होते.
एलएसडी पेपर हा अमली पदार्थ बाणेर येथे राहणाऱ्या हर्ष याच्याकडून आणला असल्याचे सांगितले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल तांबे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | लाच प्रकरणात देवेंद्र खिंवसरा यांना अटकपूर्व जामीन

Indapur Firing Case | इंदापूर गोळीबार प्रकरण: सराईत गुन्हेगार अविनाश धनवेचा पुर्ववैमनस्यातून खून, ग्रामीण पोलिसांकडून 4 जणांना अटक (Video)

Pimpri Crime Branch Raid On Spa Center | पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चार पीडित मुलींची सुटका

Nana Patole On Election Commission | नाना पटोलेंचा आयोगाला सवाल, गुजरातमध्ये एकाच टप्प्यात निवडणूका, मग महाराष्ट्रात…

Dacoity With Arms In Shirur Pune | शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू, वृद्ध गंभीर जखमी