Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना, जलतरण तलावात क्लोरीन गॅसची गळती, काही जण बेशुद्ध

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – Pimpri Chinchwad Crime News | चिंचवड शहरातील कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात (Dr. Babasaheb Ambedkar Swimming Pool) सकाळी आठच्या सुमारास क्लोरीन गॅस (Chlorine Gas) गळती झाली. पोहण्यासाठी आलेल्या व्यक्तींना त्रास होऊ लागल्याने काहीजण बेशुद्ध पडल्याचे समजते. गॅसगळती झाली तेव्हा येथे २२ जण होते त्यापैकी अकरा जणांना त्रास होऊ लागला. या सर्व बाधितांना उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (Yashwantrao Chavan Hospital) हलवण्यात आले. (Pimpri Chinchwad Crime News)

गॅसगळतीचा प्रकार वेळीच समजल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, परिस्थिती अत्यंत भीषण होती. परिसरात ५०० मीटर पर्यंत क्लोरीन गॅस पसरला होता. खबरदारी म्हणून पोलिसांनी जलतरण तलावाच्या समोरील रस्ता बंद केला. (Pimpri Chinchwad Crime News)

घटनेची खबर मिळताच पोलीस (Pimpri Chinchwad Police) आणि अग्निशमन दल (Fire Brigade) घटनास्थळी आले. सकाळच्या बॅचमधील पोहण्यासासाठी आलेल्या २० ते २२ जणांपैकी ११ जणांना गॅसगळतीमुळे त्रास होऊ लागला. दरम्यान, या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा (Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) हलगर्जीपणा समोर आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RBI Action On Banks In Maharashtra | RBI ची मोठी कारवाई, SBI नंतर महाराष्ट्रातील ‘या’ 4 सहकारी बँकांना लावला दंड

Pune Crime News | अनेक गुंतवणूकदारांची 100 कोटीहून जास्त रुपयांची फसवणूक, हवालाच्या माध्यमातून परदेशात पाठवले पैसे

MNS Avinash Jadhav | टोल प्रश्न चिघळला! मनसेच्या अविनाश जाधवांसह 12 जणांना अटक

LPG Gas Cylinder Price | 450 रुपयात मिळत आहे LPG गॅस सिलेंडर, सणासुदीमध्ये ‘या’ लोकांसाठी मोठी खुशखबर