Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : हुंड्यासाठी मुलीचा छळ, जावयाच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Crime News | जावयाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी मुलीचा छळ केल्याने मुलगी माहेरी आली होती. मुलीला नांदवण्यासाठी जावयाने व त्याच्या कुटुंबियांनी पैशांची मागणी केली. जावयाच्या त्रासाला वैतागुन सासऱ्यांनी गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केली आहे (Suicide Case). हा प्रकार जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत तळेगाव, पिंपरी, चिंचवड येथे घडला आहे.

बाळासाहेब रामभाऊ केदार (वय 57) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बाळासाहेब यांच्या 29 वर्षीय विवाहित मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार जावई विक्रांत विजय शेवाळे (वय 29), विजय गणपत शेवाळे (वय 58), एक महिला (वय 48, सर्व रा. इंद्रप्रस्थ नगरी, अंबी एम.आय.डी.सी रोड, तळेगाव) यांच्या विरोधात आयपीसी 306, 498अ, 323. 504, 34 सह हुंडा प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला.
त्यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. विक्रांत याला फ्लॅट घेण्यासाठी त्याने फिर्यादी यांच्या वडिलांकडे 50 लाख
रुपये हुंड्याची मागणी केली. हुंड्याचे पैसे जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत मुलीला नांदण्यासाठी सासरी घेऊन जाणार नाही,
अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी यांचे वडील तणावात होते. अखेर त्यांनी टोकाचे पाऊल टाकत 7 फेब्रुवारी रोजी
सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपींनी फिर्यादी विवाहितेचा शारीरिक,
मानसिक छळ करून त्यांच्या वडिलांना हुंडा मागून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक शेटे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | लाच प्रकरणात देवेंद्र खिंवसरा यांना अटकपूर्व जामीन

Indapur Firing Case | इंदापूर गोळीबार प्रकरण: सराईत गुन्हेगार अविनाश धनवेचा पुर्ववैमनस्यातून खून, ग्रामीण पोलिसांकडून 4 जणांना अटक (Video)

Pimpri Crime Branch Raid On Spa Center | पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चार पीडित मुलींची सुटका

Nana Patole On Election Commission | नाना पटोलेंचा आयोगाला सवाल, गुजरातमध्ये एकाच टप्प्यात निवडणूका, मग महाराष्ट्रात…

Dacoity With Arms In Shirur Pune | शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू, वृद्ध गंभीर जखमी