विधानसभेसाठी पिंपरी-चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ जण ‘इच्छुक’, तयारी सुरू ?

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत ‘फ्रेश’ चेह-यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील तीन जागांसाठी तब्बल १८ जणांनी निवडणूक लढविण्याची इच्छा दर्शविली असून यामध्ये नवख्यांची संख्या अधिक आहे. यामध्ये पिंपरीतून ८, चिंचवडमध्ये ७ आणि भोसरीतून तिघांचे पक्षाकडे अर्ज दाखल झाले आहेत.

२०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयुर कलाटे, राजेंद्र जगताप, युवक अघ्यक्ष विशाल वाकडकर असे ७ जणांनी अर्ज दाखल केला आहे. तर पिंपरी २०६ विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार अण्णा बनसोडे, नगरसेविका सुलक्षणा धर, राजू बनसोडे, गोरक्ष लोखंडे, संदीपान झोंबाडे, शेखर ओव्हाळ, सुनंदा काटे, गंगा धेंडे असे ८ जणांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. २०७ भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी दत्ता साने, पंडित गवळी, दत्तात्रय जगताप यांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. माजी आमदार विलास लांडे यांनी अर्ज भरला नाही.

विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्यांकडून पक्षाने अर्ज मागविले होते. १ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल करावयाचे होते. यामध्ये शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीकडे अनेकांनी इच्छा दर्शविली आहे. यामुळे माजी आमदार, माजी नगरसेवकांनी धास्ती घेतली आहे.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या सूचनेनुसार आगामी विधानसभा निवडणूकीसाठी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दिनांक १ जुलै २०१९ पर्यंत उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालयात जमा केले आहेत. पिंपरी विधानसभेतून ८, चिंचवड विधानसभेतून ७ आणि भोसरी विधानसभेतून ३ असे तिनही विधानसभा मतदारसंघातून एकूण १८ उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालयात दाखल झाले असून ते अर्ज प्रदेश कार्यालयाकडे पाठविले जाणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते फजल शेख यांनी दिली.

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ