Pimpri- Chinchwad News | ड्रीम 11 मुळे कोट्याधीश झाला अन् कायद्याच्या कचाट्यात अडकला, पोलीस उपनिरीक्षकावर कारवाईची टांगती तलवार

ऑनड्युटी गेम खेळणाऱ्या PSI ची पोलीस उपायुक्तांकडून चौकशी होणार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – Pimpri- Chinchwad News | ड्रीम एलेव्हन (Dream 11) या ऑनलाइन फँटसी गेममुळे पिंपरी चिंचवड पोलीस दलातील (Pimpri Chinchwad Police Force) पोलीस उपनिरीक्षकाचे नशीब उजळले. या क्रिकेटप्रेमी पोलीस अधिकाऱ्याला तब्बल दीड कोटी रुपयांच्या बक्षीसाची रक्कम मिळाल्याचे वृत्त समोर आले. मात्र, या करोडपती पोलीस उपनिरीक्षकाची पोलीस उपायुक्तांकडून (DCP) चौकशी केली जाणार आहे. (Pimpri- Chinchwad News)

ऑनलाईन गेमिंगमध्ये (Online Gaming) तरुण पीढी भरकटत चालली असताना फसवणूक (Cheating Case) झाल्याचे प्रकार समोर आले आहे. असं असताना पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे (PSI Somanath Zende) यांना ड्रीम 11 खेळण्याचा मोह आवरता आला नाही. मंगळवारी इंग्लंड विरुद्ध बांगलादेश सामन्यात याच ड्रीम 11 मुळं त्यांना दीड कोटींची लॉटरी लागली. दीड कोटी रुपये जिंकल्यामुळे झेंडे हे चर्चेत आले असताना दुसरीकडे ते अडचणीत आले आहेत. कर्तव्यावर असताना ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. (Pimpri- Chinchwad News)

पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडेंची आता पोलीस उपायुक्तांकडून चौकशी होणार आहे.
प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं पिंपरी चिंचवड पोलिसांकडून
स्पष्ट करण्यात आले आहे. ही चौकशी पोलीस उपायुक्त गोरे यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी सतीश माने यांनी दिली आहे. या चौकशीत त्यांच्यावर काही कारवाई होते हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जिओ कस्टमर केअर मधून बोलतोय! पुण्यातील तरुणीला 5 लाखांचा गंडा