Pimpri Chinchwad News | पिंपरी चिंचवडमध्ये ओला-सुका कचरा वेगळा न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई?

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad News | संपूर्ण जगासमोर सध्या अनेक प्रश्न उभे आहेत, ज्यांचा मानव जातीवर अतिशय वाईट परिणाम होत आहे. त्यात, जागतिक तापमान वाढ, समुद्राच्या पाण्याच्या पातळीतील वाढ आणि प्लास्टिकचा वाढता कचरा हे काही मुख्य प्रश्न आहेत. त्यात प्लास्टिकचा प्रश्न हा जनसामान्यांच्या आवाक्यातील प्रश्न आहे. म्हणजे, सर्वसामान्य माणूस अगदी थोडी काळजी घेऊन प्लास्टिकचा कचरा कमी करू शकतो. यातील एक मुख्य भाग म्हणजे ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवणे. पण अनेक नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करण्याची तयारी दाखवत नाहीत. अशा नागरिकांवर पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad News) महानगरपालिका दंडात्मक कारवाई करणार आहे.

 

पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे पिंपरी चिंचवड शहरातील स्वच्छता आणि कचर्‍याचे विलगीकरण करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नियुक्त केलेल्या आयईसी संस्थांच्या कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा झाली. त्यावेळी महापालिकेचे (Pimpri Chinchwad News) अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी या कर्मचाऱ्यांना काही सूचना दिल्या. तेव्हा ते म्हणाले,”ओला व सुका कचरा विलगीकरण न करणार्‍या नागरिकांची नोंद करून घ्यावी. सूचना देऊनही कचरा विलगीकरण न करणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया गतिमान करावी.” या कार्यक्रमाला पालिकेचे उपायुक्त अजय चारठाणकर, समन्वयक विनोद जळक, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जितेंद्र वाघ (Pimpri Chinchwad News) म्हणाले, ‘शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या अनुषंगाने पालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
पण, अद्यापही काही नागरिक कचरा विलगीकरण करत नाही, असे दिसून आले आहे.
नागरिकांनी प्रत्यक्ष कचरा विलगीकरण करण्याच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत घरात विलगीकरण केलेला कचरा घंटा गाडीत टाकताना वेगवेगळा द्यावा.
कचरा ओला, सुका, घरगुती घातक, सॅनिटरी वेस्ट व प्लास्टिक अशा वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये टाकावा.
याबाबत घंटागाडी सोबत असलेल्या कर्मचाऱ्ंयांनी नागरिकांना मार्गदर्शन करावे. तसेच घंटागाडीवर वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये टाकावयाच्या कचर्‍याचे नागरिकांना स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने तपशीलवार स्टिकर लावावेत. ओला व सुका कचरा विलगीकरण न करणार्‍या नागरिकांची नोंद करून घ्यावी. सूचना देऊनही कचरा विलगीकरण न करणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया गतिमान करावी.’

 

Web Title :- Pimpri Chinchwad News | intensify penal action against non segregation of waste municipal additional commissioner

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indian Railway | रात्री दहानंतर रेल्वेत आवाज केल्यास गाडीतून उतरावे लागेल

CitiusTech Expands Footprint | सिटीअसटेकने पुण्यात नवीन सुविधांद्वारे केला फूटप्रिंटचा विस्तार

Mohit Kamboj Target Sushma Andhare | ‘सुषमा अंधारे संजय राऊतांचे फीमेल व्हर्जन’ – मोहीत कंबोज