Mohit Kamboj Target Sushma Andhare | ‘सुषमा अंधारे संजय राऊतांचे फीमेल व्हर्जन’ – मोहीत कंबोज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mohit Kamboj Target Sushma Andhare | शिवसेनेत फूट पडल्यापासून शिवसेना आणि भाजप असा सामना राज्याच्या राजकारणात रंगला आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते भाजप आणि शिंदे गटावर सतत टीकास्त्र सोडत आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी तर भाजप आणि मनसेच्या नेत्यांना धारेवरच धरले आहे. त्या त्यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या भाषणांतून सर्वांचा समाचार घेत आहेत. त्यावर आता भाजप नेते मोहीत कंबोज यांनी टीका केली आहे. शिवसेनेने संजय राऊत यांचे फीमेल व्हर्जन लाँच केले आहे, असे म्हणत कंबोज यांनी सुषमा अंधारेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. (Mohit Kamboj Target Sushma Andhare)

 

मोहीत कंबोज यांनी ट्विटद्वारे म्हटले की, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत आणि नवाब मलिक यांचे फीमेल व्हर्जन लाँच केले आहे. सलीम जावेद आणि आता….? त्यामुळे कंबोज यांनी अप्रत्यक्षपणे सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला आहे. कंबोज यांच्या ट्विटवर आलेल्या प्रतिक्रियांमध्येही सुषमा धारेंचा उल्लेख वापरकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे कंबोज यांच्या ट्विटला सुषमा अंधारे त्यांच्या शैलीत काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

महाराष्ट्रात देवेंद्र बोले आणि राज्य चाले, अशी परिस्थिती आहे.
तुम्ही काही बोललात तर आम्ही तुमच्यावर खोट्या केसेस दाखल करू शकतो, असे होत आहे.
महाप्रबोधन यात्रा सुनियोजित पक्षाचा कार्यक्रम आहे. मात्र, शिंदे गटाने पैसा प्रचंड पेरला आणि प्रचंड माणसे तोडली आहेत.
एवढी सगळी माणसे तोडूनसुद्धा त्यांच्याकडे अजेंड्यावर काम करायला एकही माणूस नाही.
म्हणजे ‘सगळा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा’ अशी त्यांची अवस्था आहे.
त्यांच्याकडे अजेंड्यावर काम करण्यास एकही माणूस नसेल, तर त्यात त्यांचा दोष काय? पैशांवर माणसे विकत घेता येऊ शकतात.
पैशावर बुद्धी आणि निष्ठा विकत घेता येऊ शकत नाही, असे सुषमा अंधारे अलीकडे महाप्रबोधन यात्रेत म्हणाल्या होत्या.

 

Web Title :- Mohit Kamboj Target Sushma Andhare | uddhav thackeray launches female version of sanjay raut nawab malik bjp mohit kamboj target sushma andhare

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

IND vs BAN Test Series | पहिल्या कसोटीसाठी बांगलादेशचा संघ जाहीर; ‘हा’ अष्टपैलू खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

India Australia Women T20 Series | भारत-ऑस्ट्रेलिया महिला ट्वेन्टी-20 मालिका आजपासून; कोण करणार विजयी सुरुवात?

Radhakrishna Vikhe-Patil | 3 हजार 110 तलाठी पदांची भरती प्रक्रिया लवकरच – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील