Pimpri Chinchwad Police News | अश्लील व्हिडिओ पाठवून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल; कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Police News | अश्लील व्हिडिओ (Porn Videos) पाठवून एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार (Sexual abuse of a Minor) केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार कोंढवा बुद्रुक परिसरातील एका सोसायटीच्या वॉशरुममध्ये नोव्हेंबर 2023 पासून वेळोवेळी घडला आहे. (Pimpri Chinchwad Police News)

याप्रकरणी पीडित 16 वर्षाच्या मुलाने बुधवारी (दि.20) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन उमेश तिवारी (वय-30 रा. काकडे वस्ती, कोंढवा बु.) याच्यावर आयपीसी 377 सह पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pimpri Chinchwad Police News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तिवारी हा पीडित मुलगा राहत असलेल्या सोसायटीचा वॉचमन
(Watchman) आहे. त्याने पीडित मुलाला वेळोवेळी व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओ पाठवले.
त्यानंतर मुलाला सोसायटीच्या वॉशरुममध्ये घेऊ गेला. त्याठिकाणी मुलासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी मुलाने त्याला नकार दिला असता आरोपीने अश्लील चाळे करुन जबरदस्तीने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले.
मुलाने याबाबत घरच्यांना सांगतले असता घरच्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी आरोपीवर बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Navale Bridge Accident | पुण्यातील नवले ब्रिजवर रिक्षाची ट्रॅव्हल्सला धडक, एकाचा मृत्यू

Pune Pimpri Chinchwad Police News | भागीदाराची पाच कोटींची फसवणूक, बिल्डर डॉ. महेश कोटबागी यांच्यावर गुन्हा दाखल; वारजे परिसरातील प्रकार

Pune Police MPDA Action | वारजे माळवाडी परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 73 वी स्थानबध्दतेची कारवाई

Benefits Of Raw Garlic | सकाळी अनोशापोटी कच्चा लसूण खाल्याने होतात जबरदस्त फायदे…