Pimpri Chinchwad Police | पिंपरी : वाहतूक पोलिसांनी एका आठवड्यात 3435 वाहनांच्या काढल्या काळ्या काचा

पिंपरी : Pimpri Chinchwad Police | पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी काळ्या काचा लावणाऱ्या वाहन चालकांविरोधात मोठी कारवाई केली. 29 मार्च ते 4 एप्रिल या एक आठवड्याच्या कालावधीत पोलिसांनी 3 हजार 435 वाहनांच्या काळ्या काचा काढल्या आहेत. काळ्या काचा काढून वाहन चालकांवर आर्थिक दंडाची करवाई देखील केली आहे.

वाहनांच्या काचांना काळ्या फिती लावून काचेची पारदर्शकता कमी करण्याच्या प्रकारावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. तेव्हापासून अशा प्रकारे वाहनांच्या काचांना काळ्या फिती लावल्याचे आढळून आल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. वाहनांच्या काचांना ‘टिन्टेड फिल्म’ (काळ्या रंगाची स्क्रीन) लावणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाया होत असतानाही या फिल्म सर्रास लावल्या जातात. यामुळेच पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी या वाहनचालकांविरोधात कारवाईची विशेष मोहीम राबवली. (Pimpri Chinchwad Police)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने मागील आठवड्यात काळी काच लावणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबली. चारचाकी वाहनांना काळी काच लावलेल्या एकूण 3 हजार 435 वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच वाहन चालकांवर 37 लाख 91 हजार 500 रुपयांचा दंड आकारला आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड म्हणाले,
काळ्या काचा आणि इतर वेगवेगळ्या नियमभंगाबाबत वाहतूक विभागाकडून विशेष मोहीम राबवून कारवाई केली जात आहे.
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून होणारी दंडात्मक आणि न्यायालयीन कारवाई टाळावी.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे याच्या आदेशाने अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड
यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Praful Patel | प्रफुल्ल पटेलांची 840 कोटींची केस सीबीआयने बंद केली,
आता काहीही बोलू शकतो असं त्यांना वाटतंय : रोहित पवार

Pune Police News | पुणे: पोलिस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

Pune Dhankawadi Crime | पुणे : घराचे बनावट कुलमुखत्यारपत्र तयार केल्याप्रकरणी तिघांना अटक