Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 136 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज (शुक्रवार) कोरोनाच्या (Pimpri Corona) नविन रुग्णांची संख्या दीडशेच्या आत आली आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये नवीन रुग्णांची संख्या वाढत असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 136 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 136 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 73 हजार 992 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 103 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 69 हजार 426 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात 857 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 857 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 03 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4440 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Pimpri Corona)

 

दिवसभरात 18,048 जणांचे लसीकरण

शुक्रवारी (दि.1) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 18 हजार 048 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 19 लाख 68 हजार 118 जणांना लस देण्यात आली आहे. (Pimpri Corona)

 

Web Title : Pimpri Corona | 136 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours; Learn other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Balasaheb Thorat | खबरदार ! शेतकऱ्यांना पाण्यात जाऊन फोटो काढायला लावल्यास कारवाई करणार – बाळासाहेब थोरात

Essential Supplements For Women | महिलांनी 30 च्या वयात आवश्य घेतले पाहिजेत ‘हे’ 5 सप्लीमेंट्स

Ashish Shelar | आमदार आशिष शेलारांकडून सूचक विधान, म्हणाले – ‘2 पक्षांकडून भाजपाला संकेत मिळाताहेत’