Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 163 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. आज शहरात नविन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 163 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 163 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 64 हजार 361 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 063 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 59 हजार 133 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 885 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 04 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4343 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी (दि.30) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खाजगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 5257 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 10 लाख 79 हजार 056 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | 163 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad in last 24 hours, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Home Loan Tips | पहिल्यांदा घर खरेदी करण्याचा विचार करत आहात का? मग उपयोगी पडतील ‘या’ 5 होम लोन टिप्स

Minister Nitin Raut | पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुलीला स्थगिती; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा

Ginger | आले वजन कमी करते, दररोज ‘या’ पध्दतीनं सेवन करा, जाणून घ्या