Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 167 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad Corona) कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. शहरात आज नविन रुग्णांची (New patient) संख्या दोनशेच्या आत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 167 नवीन रुग्ण (Pimpri Corona) आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 167 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Corona-infected patients) संख्या 2 लाख 67 हजार 930 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 62 हजार 594 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात 1211 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 1211 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
आज दिवसभरात शहरात पूर्वी मृत्यू झालेल्या 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 6,317 हजार जणांना लस

शुक्रवारी (दि.20) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड -19 लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 6 हजार 317 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 13 लाख 01 हजार 287 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | 167 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पतीचे जावेसोबत प्रेमसंबंध, पत्नीने उचलले टोकाचे पाऊल; पुण्याच्या विश्रांतवाडी येथील टिंगरेनगर परिसरातील घटना

Oily Spicy Food | चटपटीत आणि मसालेदार जेवणाची आवड असेल तर, जाणून घ्या जास्त तेल, मसाला खाण्याचे 10 दुष्परिणाम

Thane Crime Branch Police | जन आशीर्वाद यात्रेत खिसे कापणारी मालेगावची टोळी अटकेत; लाखोंचा ऐवज हस्तगत