Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 193 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  Pimpri Corona |पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांची संख्या वाढत आहे. मध्यंतरी शहरात रुग्णांची संख्या घटली होती तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांची संख्या वाढत असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 193 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 193 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 70 हजार 303 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 135 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 64 हजार 680 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरामध्ये सध्या 1481 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील 03 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4402 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी (दि.4) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खाजगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 8,764 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 15 लाख 07 हजार 237 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | 193 new patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 391 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

IRDAI ने Bharti AXA-ICICI Lombard डील करता दिली मंजूरी, जनरल इन्श्युरन्स व्यवसायाच्या बाहेर पडणार ‘भारती एक्सा’

6 लाखाच्या फायद्यासाठी Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक; 5 वर्षातच मिळेल मोठा रिटर्न, जाणून घ्या