Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 211 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मागील काही दिवसांपासून नव्याने (Pimpri Corona) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 211 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 211 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 66 हजार 474 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 227 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 61 हजार 335 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 772 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 03 रुग्ण शहरातील आहेत.
तर 01 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4367 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी (दि.11) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 7904 जणांना लस देण्यात आली आहे.आजपर्यंत शहारमध्ये 11 लाख 88 हजार 565 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title :  Pimpri Corona | 211 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Police Recruitment – 2019 | पोलीस भरती 2019 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना माहिती अपडेट करण्यासाठी मुदत वाढ

Weather Update | आगामी 5 दिवसांत कोकणसह मध्य महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता

Modi Government | मोदी सरकारच्या योजनेत दरमहिना एक रुपया खर्च करून मिळवू शकता 2 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या