Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 220 नवीन रुग्ण, 237 जणांना डिस्चार्ज

ADV

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही शहराला दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 220 नवीन रुग्ण (Pimpri Corona) आढळून आले आहेत. तर 04 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 220 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 65 हजार 613 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 237 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 60 हजार 381 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 878 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात
शहराबाहेरील तीन रुग्णाच्या मृत्यूची तर शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून या
रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात शहरात एका रुग्णाचा मृत्यू
झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4354 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 10,621 जणांचे लसीकरण

शुक्रवारी (दि.6) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 10 हजार 621 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारामध्ये 11 लाख 51 हजार 545 जणांना लस देण्यात आली आहे.

हे देखील वाचा

Chandrakant Patil And Raj Thackeray | ‘युतीचा कोणताच प्रस्ताव बैठकीत नव्हता’; भाजपाकडून स्पष्ट

Khel Ratna Award |….म्हणून बदललं राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव; PM मोदींनी सांगितलं ‘हे’ कारण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pimpri Corona | 220 new corona patients discharged in Pimpri Chinchwad in last 24 hours, 237 discharged

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update