Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 254 नवीन रुग्ण, 287 रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad City) मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या (Pimpri Corona) नवीन रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तर कोरोनामुक्त (Recover patient) होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. रुग्ण वाढत असल्याने सक्रिय (Active patient) रुग्णांची संख्या वाढली आहे. परंतु गेल्या 24 तासात शहरात बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 254 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 03 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. Pimpri Corona | 254 new patients of Corona in Pimpri Chinchwad

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 254 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 60 हजार 223 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 287 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 54 हजार 580 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.
शहरामध्ये सध्या 1 हजार 341 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
आज दिवसभरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4302 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी (दि.9) शहरामध्ये 35 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 17 खासगी कोविड लसीकरण केद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 8594 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 7 लाख 52 हजार 941 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : Pimpri Corona | 254 new patients of Corona in Pimpri Chinchwad

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update