Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 34 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, रुग्ण बरे (Recover) होण्याचे प्रमाण कमी झाल्याने सक्रिय रुग्णांच्या (active patient) संख्येत हळूहळू वाढ होत आहे. तर दुसरीकडे शहरात मृत्यूचे प्रमाण (Fatality Rate) घटल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात शहरात एकाही रुग्णाचा (Pimpri Corona) मृत्यू झालेला नाही. तर 34 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. याचवेळी 25 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.

 

आज दिवसभरात 6 हजार 814 संशयितांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये 34 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Report positive) आला आहे. आजपर्यंत शहरात 23 लाख 24 हजार 551 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 2 लाख 78 हजार 186 जणांना कोरोनाची बाधा (Pimpri Corona) झाली आहे. तर 2 लाख 74 हजार 186 जण कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 375 इतकी झाली आहे. यामध्ये 212 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत. तर 163 लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. शहरात आजपर्यंत 4519 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Pimpri Corona)

 

आज शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 08 हजार 066 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 28 लाख 71 हजार 348 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | 34 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thackeray Government | ठाकरे सरकारकडून छत्रपती संभाजी महारांच्या स्मारकाविषयी महत्वाचा निर्णय

तुमचे सुद्धा असेल EPF Account तर आवश्य जाणून घ्या नवीन बदल, अन्यथा लाभापासून राहाल वंचित

Pooja Hegde | पूजा हेगडेनं बिकिनी घालून कडाक्याच्या थंडीत वाढवली ‘गर्मी’, फोटो झाले व्हायरल