Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 254 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 120 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 120 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 71 हजार 696 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 254 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 67 हजार 011 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात 1004 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 1004 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 01 रुग्ण शहरातील आहेत.
तर 01 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4412 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 13822 जणांचे लसीकरण

सोमवारी (दि.13) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 13,822 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 16 लाख 46 हजार 370 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | Discharge of 254 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LIC Aadhaar Shila | महिलांसाठी ‘एलआयसी’नं आणली एक खास पॉलिसी; लाखोंचा होईल ‘लाभ’; जाणुन घ्या

ENG-PAK Cricket | भारतावर राग काढण्यासाठी आता PAK ला खुश करण्यासाठी निघाले इंग्लंड क्रिकेट बोर्ड, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Thane Anti Corruption | 4 लाखाची लाच घेऊन पुन्हा 1 लाखाची मागणी, सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात