Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 67 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 67 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 153 रुग्ण बरे झाले आहेत.

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 3 हजार 029 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 67 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 555 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 153 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 093 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे. शहरामध्ये सध्या 573 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 55 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 518 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आज शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 6316 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 34 लाख 10 हजार 402 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Update | 67 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा