Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 334 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आसून आज शहरातील रुग्णांची संख्या ही दोनशेच्या आत आहे. रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 152 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 334 रुग्ण बरे झाले आहेत.

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 4 हजार 495 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली.
यामध्ये 152 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 57 हजार 988 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 334 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 52 हजार 814 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

 

शहरामध्ये सध्या 1289 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 76 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1213 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरात 02 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 02 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,616 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Web Title :-  Pimpri Corona Update | In Pimpri-Chinchwad, 334 patients were corona free in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पंचायत समितीमधली महिला कनिष्ठ सहायक 500 रुपये लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Pune Crime | तडीपार सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

 

Pune NCP | पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ठरतेय ‘घुमजाव पार्टी’