पिंपरी : थायलंड येथून परतलेल्या ‘वऱ्हाडी’ना घरातच पण विभक्त राहण्याच्या आयुक्तांच्या सूचना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – लग्न समारंभासाठी थायलंड येथून जाऊन परतलेल्या पिंपरी चिंचवड परिसरातील वऱ्हाडी मंडळींना घरातच पण विभक्त (होम बेस्ड क्वारंटाईन) राहण्याच्या सूचना पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या आहेत. साधारण ९० जण थायलंड हुन परत आले असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कोरिनाचा शिरकाव झालेल्या देशातून शहरात आलेल्या प्रवाशांनाही या प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात तीनजणांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. ही शहरासाठी धक्कादायक बाब आहे. हे रुग्ण दुबई येथून पिंपरी-चिंचवडमध्ये आल्याने करोनाचा विषाणू त्यांच्यामार्फत शहरात दाखल झाल्याचे मानले जात आहे. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयातील आयसोलेशन विभागात उपचार सुरू आहेत. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेचा विद्यकीय विभाग कसोशिने प्रयत्न करत आहे.

पिंपरी चिंचवड मध्ये राहणा-या एका प्रतिष्ठित कुटुंबातील विवाह सोहळा थायलंड येथे आयोजित केला होता. या विवाह सोहळ्यासाठी भोसरी परिसरातील ९० हून अधिक व-हाडी मंडळी विमानाने थायलंड येथे पोहोचली. विवाह सोहळा उरकल्यानंतर ते दोन दिवसांपूर्वी विमानाने शहरात परतले आहेत. त्यांचा विमानतळावर तसेच शहरात अनेकांशी संपर्क आला असण्याची शक्यता आहे.

संबंधित कुटुंब प्रमुखांशी यासंदर्भात आयुक्तांची चर्चा झाली असून त्यांच्याकडून प्रवाशांची माहिती मागवली आहे. प्रवासाचे टप्पे तपासून पुढील कार्यवाही करण्यात येईल. तोपर्यंत विवाह सोहळा साजरा करण्यासाठी विदेशी गेलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबामध्ये ”होम बेस्ड कॉरंटाईन” (घरातील इतर सदस्यांपासून विभक्त) करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच कोरिनाचा शिरकाव झालेल्या देशातून शहरात आलेल्या प्रवाशांनाही या प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.