फॉर्च्यूनरमधील कर्ज बुडविणाऱ्याने बँक अधिकाऱ्याला धमकावून सोनसाखळी हिसकाविली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – व्यवसाय आणि आलिशान कार घेण्यासाठी कर्ज घेऊन सेवा विकास बँकेची १९ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सागर सूर्यवंशी याने कर्ज फेडणार नाही आणि तुझ्या चेअरमनला बघून घेतो, अशी धमकी देऊन बँक अधिकाऱ्यांच्या गळ्यातील १ लाख ३३ हजार रुपयांची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी सागर मारुती सूर्यंवंशी (वय ३८, रा. पिंपरी कॅम्प) व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी महेश रोहिदास रोकडे (वय ३१, रा. साई श्रद्धा अपार्टमेंट, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. महेश रोकडे यांनी गुरुवारी दुपारी पिंपरीतील आयप्पा रोड येथे सागर सूर्यवंशी यांची भेट घेतली व कर्जाबाबत बँकेमध्ये चला असे सांगितले. त्यावेळी सागर सूर्यवंशी याने त्यांची कॉलर पकडून सांगितले की, तू लई शहाणा झाला का मला कर्जाबाबत विचारायला. मी बँकेचे कर्ज फेडणार नाही. जा तुला कराय करायचे ते कर. तुला आणि तुझ्या चेअरमनला बघुनच घेतो, अशी धमकी दिली. त्यानंतर सागर याने महेश यांच्याशी झटापटी करुन त्यांच्या फॉर्च्यूनर गाडीच्या ड्रायव्हरला चल गाडी काढ असे म्हणून त्यांच्या गळ्यातील १ लाख ३३ हजार रुपयांची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून घेऊन दोन मित्रांसह पळून गेले.

सेवा विकास बँकेची १९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वी पिंपरी पोलिसांनी सागर सूर्यवंशी व त्याची पत्नी शितल सूर्यवंशी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like