Pimpri Crime News | अल्पवयीन मुलीला लग्न झाल्याचे भासवून केला बलात्कार; काही दिवस एकत्र राहिल्यानंतर दिले आईवडिलांकडे सोडून

पिंपरी : Pimpri Crime News | मंदिरात गळ्यात हार व नकली मंगळसुत्र घालून लग्न झाल्याचे भासवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार (Rape) केला. काही दिवस एकत्र राहिल्यानंतर मुलीला आईवडिलांकडे सोडून लग्नास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी (chikhali police) व्यंकटेश जयराम पवार (Venkatesh Jayaram Pawar)
(वय २२, रा. शरदनगर, चिखली) याच्याविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२१ पासून सुरु होता. (Pimpri Crime News)

व्यंकटेश आणि एका अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध (Love Affair) होते. मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर त्यांनी कोर्ट मॅरेज करण्याचे ठरविले होते. असे असताना जानेवारी २१ मध्ये व्यंकटेश याने या मुलीला चिंचवडमधील संभाजीनगर येथील रुममध्ये घेऊन गेला. आता आपले लग्न होणारच आहे. आपण आता पतीपत्नी होणारच आहोत, असे बोलून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी आरोपीच्या घरी त्याने तिच्याबरोबर पुन्हा शरीरसंबंध केला. याची माहिती तिच्या आईवडिलांना मिळाल्यावर त्यांनी या मुलीला बदलापूर येथील तिच्या काकाच्या घरी रहायला पाठविले. तिने तिकडे व्यंकटेशला बोलावून ती त्याच्याबरोबर निघून गेली.

१७ जून रोजी व्यंकटेशने तिला पनवेल रोडवरील एका शंकराचे मंदिरात नेले. तेथे तिच्या गळ्यात हार व नकली मंगळसुत्र घालून आपले लग्न झाले आहे, असे सांगितले. त्यानंतर ते पनवेल येथील हरीग्राममध्ये एका भाड्याचे खोलीत राहून लागले. तेथे पतीपत्नीसारखे राहत होते. त्यानंतर व्यंकटेश हा तिला घेऊन ८ जुलै रोजी पुण्यात आला.

हिंगोली, नांदेड, यवतमाळमध्ये भुकंपाचे धक्के

पोलीस चौकीत या मुलीने आम्ही दोघांनी लग्न केले आहे. मी सज्ञान असून मी व्यंकटेश पवार
याच्यासोबत जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ती व्यंकटेशबरोबर निघून गेली होती. मात्र,
व्यंकटेश याने तिला आपल्या आईवडिलांच्या घरी न नेता मुलीला तिच्या आईवडिलांच्या घरी सोडले.
त्यानंतर १० जुलै रोजी त्याने लग्न करण्यास टाळाटाळ करुन मी तुझ्याबरोबर लग्न करणार नाही.
तुझा माझा आता काही एक संबंध नाही. तु तुझे बघून घे, असे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक
झाल्याचे लक्षात आल्यावर तिने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली आहे.

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pimpri crime news | rape on minor girl in chikhali area of pimpri chinchwad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update