निर्घृण खूनाच्या निषेधार्थ पिंपरी बाजारपेठ बंद

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पिंपरी येथील हितेश मुलचंदानीच्या निर्घृण खूनाच्या निषेधार्थ पिंपरी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन निषेध व्यक्त केला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

हितेशच्या मित्रांचे पिंपरी येथील कुणाल हॉटेलमध्ये बिलावरून वाद झाले. किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले. हॉटेलमध्ये भांडण सुरू असल्याबाबत हितेश याला त्याच्या मित्राचा फोन आला. हितेशने त्याच्या काही मित्रांसोबत कुणाल हॉटेल गाठले. हॉटेलमध्ये सुरू असलेली भांडणे सोडवत असताना चार इसमांनी हितेशला जबरदस्तीने मोटारीत बसवले.

चौघांनी हितेशला पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर आणले. तिथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तसेच त्याचा गळा चिरला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या हितेशचा मृत्यू झाला.

बुधवारी पिंपरी मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. आज सकाळी येथील व्यापाऱ्यांनी हातात ‘वुई वॉन्ट जस्टीस’ ‘गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे’ असे फलक घेऊन निदर्शने केली.

आरोग्यविषयक वृत्त –