पिंपरी : शस्त्राने वार करुन मुलाने केला वडिलांचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – वडिलोपार्जित इस्टेट व पैशाच्या कारणावरून जन्मदात्या धारदार शस्त्राने वार करून वडिलांचा खून केला. ही घटना दापोडी येथे मंगळवारी (दि.16) घडली. सुनील मुतय्या पोलकम ( 68, रा. भाटीया चाळ, दापोडी) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा राजेश सुनील पोलकम (38, रा. इंद्रायणीनगर, दापोडी) असे पोलिसांनी अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. योगेश रमेश येवले (वय 35, रा. सुंदरबाग कॉलनी, दापोडी) यांनी बुधवारी (दि. 17) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश आणि त्याचे वडिल सुनील यांच्यात नेहमी वडिलोपार्जित इस्टेट व पैशाच्या कारणावरून भांडण होत असे. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारासही त्यांच्यात भांडण झाल्याने आरोपी राजेश याने आपल्या वडिलांना दोरीने बांधले. त्यानंतर आरोपीने त्यांच्यावर कोणत्यातरी धारदार शस्त्राने वार केला. हा प्रकार सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत सुरू होता. दरम्यान जखमी झालेल्या सुनील यांचा मृत्यू झाला. तपास भोसरी पोलीस करीत आहेत.