पिंपरी : दारु पिण्याच्या वादातून चिंचवडला मित्राचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मित्रांसोबत दारू पित असताना झालेल्या वादातून मित्रांनी डोक्यात बेसिन घालून मित्राचा खून केल्याची घटना हॉटेल खुशबूच्या पाठीमागे रविवारी मध्यरात्री घडली.
शुभम साठे (२०, रा. थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर कृष्णा भारत कापुरे, अजय मोहन क्षीरसागर आणि ज्ञानेश सुनील थोरात या तिघांना ताब्यात घेतले आहे.

चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; रविवारी रात्री शुभम आणि त्याचे मित्र पार्टीसाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला असता तिघांनी शुभमच्या डोक्यात बेसिन घातले. यामध्ये शुभमचा मृत्यू झाला. हा प्रकार सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आला.

चिंचवड काळेवाडी रस्त्यावरील काळेवाडी पुलाशेजारी असलेल्या हॉटेल खुशबू पाठीमागे हा प्रकार घडला आहे. तपास पोलीस करत आहेत.