Pimpri Traffic News | पिंपरीत कार्तिकी यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Traffic News | आळंदीत 16 ते 23 नोव्हेंबर दरम्यान कार्तिकी यात्रा होणार आहे. या कार्तिकी यात्रेला महाराष्ट्रभरातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला (Saint Dnyaneshwar Maharaj Sanjeevan Samadhi) भाविक येतात. त्यामुळे पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांकडून (Pimpri Chinchwad Traffic Police) वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. वाहन चालकांनी (Pimpri Traffic News) पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने (Assistant Commissioner of Police Satish Mane) यांनी केले आहे.

वाहतूक बदल खालीलप्रमाणे – ठिकाण आणि पर्यायी मार्ग (Pimpri Traffic News)

1) मोशी चौकातून नगरकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी: जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे तसेच भोसरी-आळंदी रस्त्याने मॅगझीन चौक मार्गे व मोशी-चाकण ते शिक्रापूर मार्गे

2) भारतमाता चौक, मोशी येथून नगरकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी: जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे तसेच भोसरी-आळंदी रस्त्याने मॅगझीन चौक मार्गे व मोशी-चाकण ते शिक्रापूर मार्गे

3) चिंबळीफाटा चौक, चाकण येथून नगरकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी: जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे तसेच भोसरी-आळंदी रस्त्याने दिघी मॅगझीन चौक मार्गे

4) आळंदी फाटा चौक चाकण येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी:जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे तसेच भोसरी-आळंदी रस्त्याने मॅगझीन चौक

5) चाकण-वडगाव घेणंद मार्गे आळंदीकडे येणाऱ्या वाहणांना प्रवेशबंदी: कोयाळी कमान, कोयाळी – मरकळ गाव मार्गे

6) पुणे-दिघी मॅगझीन चौकाकडून आळंदीकडे येणाऱ्या वाहानांना प्रवेशबंदी: भोसरी आळंदी रस्त्याने इच्छित स्थळी, तसेच असंकापुरम- जयगणेश साम्राज्य चौक मार्गे

7) मरकळपासून धानोरे फाटामार्गे आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी: धानोरे फाटा – चऱ्हेली फाटा – मॅगझीन चौक, अलंकापुरम चौक मार्गे

8) पुण्याकडून आळंदीकडे जाणाऱ्या वाहनांना काळे कॉलनी, तापकीर चौक, चऱ्होली फाटा यापुढे जाण्यास प्रवेश बंद

9) देहू कमान (जुना मुंबई-पुणे महामार्ग) येथून देहूगावकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद – भक्ती-शक्ती चौक
ते त्रिवेणीनगर मार्गे खंडेलवाल चौक ते देहूगाव

Web Title :-  Pimpri Traffic News | traffic changes on the occasion of kartiki yatra motorists please use an alternate route

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यातील बुधवार पेठीतील क्रांती चौकात दोन गटांत कोयत्याने मारामारी

Jitendra Awhad | जामीन मिळताच आव्हाडांची प्रतिक्रिया; “…मला संपवण्यासाठी ठरवून”