कोंढव्यात गावठी पिस्तुल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तरप्रदेशातून आलेला तरुण कोंढव्यात हत्यार घेऊन उभा असल्याच्या माहितीवरुन कोंढवा पोलिसांनी एकाला पकडून त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. साजिद रेहमान सय्यद (वय २५, रा. राजीव गांधीनगर झोपडपट्टी, साळुंखे विहार, मुळ गाव बुराहपूर, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे.

याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी ‘पोलीसनामा’ला सांगितले की, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस शिपाई आदर्श चव्हाण व उमेश शेलार हे गस्त घालत असताना चव्हाण यांना कोंढव्यातील प्रतिभाताई शाळेसमोरील मल्हार चौक येथे एक जण हत्यार घेऊन उभा असल्याचे माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, उपनिरीक्षक संतोष शिंदे, तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन पाहिले असता मिळालेल्या माहितीनुसार तेथे एक जण उभा होता. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी सुनिल फुलारी, अप्पर पो.आयुक्त पु. प्र. विभाग, सुहास बावचे पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, सुनील कलगुटकर, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, मुरलीधर करपे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस ठाणे, महादेव कुंभार पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि.चेतन मोरे, पोउपनि संतोष शिंदे, तपास पथक, कोंढवा पोलीस ठाणे व तपास पथकातील कर्मचारी यांनी केली आहे.

Visit : policenama.com