कधी विवाह करणार ? यावर कॅटरीना म्हणते…

मुंबई : वृत्तसंस्था – यावर्षात अनेक सेलिब्रिटीज विवाहबंधनात अडकल्याचे पाहायला मिळाले. आठवडाभरात संपत असलेल्या 2018 या वर्षाने बॉलीवूडसाठी अनेक आनंददायी बातम्या दिल्या. वर्षाच्या अखेरीस दीपिका पदुकोन-रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा-निक जोनस यांचे विवाह चांगलेच गाजताना दिसून आले.

परंतु आता अभिनेत्री कॅटरिनाच्या संभाव्य विवाहाबद्दलही चर्चा रंगताना दिसत आहे. अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोन व प्रियांका चोप्रानंतर यांचे विवाह धुमधडाक्यात पार पडले. यानंतर विवाहासंदर्भात आता बॉलीवूड अभिनेत्री कॅटरीनाने आपले मत मांडले आहे. तिच्या मते  आताच विवाहाचे प्लॅनिंग करणे अवघड आहे.

कॅटरिनाला तिच्या विवाहाबद्दल विचारण्यात आले. ती कधी विवाह करणार असे तिला विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना कॅट म्हणाली की, “विवाहासंदर्भात मला प्रत्येक जण प्रश्‍न करत आहेत. मात्र, माझ्या मते विवाहाचे प्लॅन करणे अत्यंत अवघड आहे. तुम्ही इंटरनेटवर गेला आणि एखादे बटण प्रेस केले आणि तुम्हाला लागलीच कोणीतरी मिळाले, असे कधीच होत नाही. यामुळे अशा गोष्टींना काळावर सोडलेलेच बरे असते.
पुढे बोलताना कॅट म्हणाली की, “जर तुम्हाला वाटत असेल की, योग्य माणसाचा शोध तुम्ही तेथेही करू शकता, तर तुम्ही खुशाल करा. मात्र, माझ्या मते अशा गोष्टींचे प्लॅनिंग करून काहीच साध्य होऊ शकत नाही. काही वेळा आम्ही काही गोष्टींसाठी प्लॅन करत असतो, मात्र तसे होत नाही. तर कधी कधी कोणताही प्लॅन नसताना सर्वकाही अचानक घडून येते. यामुळे विवाहासारख्या गोष्टी काळावरच सोडून दिल्यास ते योग्य ठरेल.”
विवाहाच्या गोष्टी काळावरच सोडलेल्या बऱ्या असे या कॅटचे विवाहासंदर्भात मत आहे. याचाच अर्थ सध्या तरी विवाहाबद्दल ती न्युट्रल असल्याचेच दिसत आहे. सध्या लग्नाच्या बाबतीत तिचा कोणताही विचार नसावा असेच तिच्या उत्तरावरून लक्षात येत आहे.