Coronavirus : औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची MIM ची मागणी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने सर्वत्र दशहत निर्माण केली आहे. कोरोनाचा परिणाम अर्थव्यवस्थेसह प्रत्येक क्षेत्रावर झाल्याचे दिसून येत आहे. भारतात सुद्धा कोरोना पसरला असून आतापर्यंत 40 केसेस आढळल्या आहेत. यामुळे भितीचे वातावरण आहे. आगामी काही दिवसात औरंगाबाद महापालिकेची निवडणूक असून कोरोनाची दशहत पाहता ही निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केली आहे.

एमआयएमने घेतला धसका
इम्तियाज जलील यांनी केलेली मागणी पाहता, महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रानेही कोरोना व्हायरसचा धसका घेतल्याचे दिसत आहे. निवडणूक होत नाही तोपर्यंत औरंगाबाद महापालिकेवर प्रशासक नेमण्यात यावा, अशी मागणीही जलील यांनी केली आहे. मात्र, अद्याप ही निवडणूक जाहीरच झालेली नाही, तत्पूर्वीच एमआयएमने ही मागणी केली आहे. यावर निवडणूक आयोग कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पवारांनी रद्द केला दौरा
नाशिकमध्ये कोरोनाचे 4 संशयित चार रुग्ण आढळले होते. परंतु, तपासणीनंतर पैकी कुणालाही कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरी सुद्धा कोरोनाची भिती येथे अजूनही दिसत आहे. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शरद पवारांनी त्यांचा नाशिक दौरा रद्द केला. आजच शरद पवार यांचा नाशिक दौराही कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आला आहे. त्या पाठोपाठ आता एमआयएमने कोरोना व्हायरसचे कारण देत महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

सर्व राजकीय पक्षांनी औरंगाबाद महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली असताना एमआयएमने मात्र कोरोना व्हायरसचे कारण पुढे करत ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. या मागणी मागे खरोखरंच कोरोनाची भिती आहे की, अन्य राजकीय कारण यावर आता चर्चा सुरू झाली आहे.