“विठ्ठला या सरकारला सुबुद्धी दे” – खासदार राजू शेट्टी यांचे विठुरायाकडे साकडे

पंढरपूर: पोलीसनामा ऑनलाईन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (सोमवार) पासून पुकारलेल्या बेमुदत दूध बंद आंदोलनास  खासदार राजू शेट्टी यांनी विठूरायाचा  दुग्धाभिषेक करुन प्रारंभ केला. कर्नाटक व केरळच्या धर्तीवर राज्यातही दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाच्या मागणीसाठी हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. ‘विठ्ठला या सरकारला सुबुध्दी दे’,अशी विनवणी  आपण विठूरायाला केल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले.

“विठ्ठल मंदिरात नामदेव पायरीशी दर्शन घेऊन दुग्धाभिषेक घातला. दूधाचा उत्पादन खर्च ३५  रुपये आणि दर मिळतोय १७ रुपये, पांडुरंगा महाराष्ट्रातील तमाम दूध उत्पादक निम्म्या दराने दूध विकतोय, अशी व्यथा मी मांडली आणि तूच आता यात लक्ष घाल असं साकडं श्री विठ्ठलाला घातलं.”यावेळी बोलताना खा. शेट्टी म्हणाले.

[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f6f74153-88b4-11e8-a603-dd59f5934668′]

आज रविवारी मध्यरात्री अगोदर जाहिर केल्याप्रमाणे आंदोलन सुरु  होणार होते. अनेक ठिकाणी स्वाभिमानीच्या आंदोलकांनी दूधाचे टॅंकर अडवले, दुग्धाभिषेक करुन आंदोलनास त्या-त्या भागात प्रारंभ केला. पण .राज्यातील विविध भागात पोलिसांनी स्वाभिमानीसह किसान सभा आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांना नोटिसा  पाठवणे ,अटक करणे,धमकी देणे, या पोलिसांच्या प्रकारामुळे आधीच आंदोलन सुरु झाले आणि  यात काहींना ताब्यात घेण्यात आले आहे.

“सरकारने निर्णय घ्यावा नाही तर येत्या आषाढी वारीला मुख्यमंत्री  येतील , त्यावेळी काय करायचं ते पाहू. आंदोलन बेमुदत असेल, मुंबईला थेंबभरही दुध जाणार नाही. फुकट घ्या, पण विकत मिळणार नाही. आम्ही आंदोलनातील  सहभागी शेतकरी दूध घालणार नाही. मुंबई, पुण्याकडे जाणारे टँकर पुढे जाऊ दिले जाणार नाहीत. पुरुष कार्यकर्त्यांसोबतच  महिलांची आघाडीसुद्धा आंदोलनात सहभागी होणार आहे. तसेच, परराज्यातून दररोज येणारे साधारणतः दीड लाख लिटर दुधाचाही पुरवठा होणार नाही. यासाठी गुजरातमधून हार्दीक पटेलनेहि या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे स्वाभिमानीचे नेते सांगत अाहेत. अशीच रणनीती कर्नाटक, मध्य प्रदेशातूनही अाखण्यात अाली अाहे. अांदोलनाची सुरवात पश्चिम महाराष्ट्रातून होत असली तरी याच्या सोबतीला विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातही दुधाचे हे आंदोलन पेटविण्याची रणनीती तयार करण्यात अाली अाहे.

[amazon_link asins=’B0756Z242J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1dd3bbb0-88ba-11e8-b9d5-c1691bfcfcbf’]

आंदोलनातील घडामोडी…

नगर जिल्ह्यात आंदोलनास प्रारंभ केला असून शिर्डी, मध्ये साईबाबा मंदिरासमोर दुग्धाभिषेक करण्याचा प्रयत्न  करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरेंसह काही कार्यकर्ते ताब्यात घेतले गेले आहे. पाथर्डी तालुकाध्यक्ष शरद मरकड यांनाही केली अटक करण्यात  आली आहे.अकोल्यात दुध संघाचा आंदोलनाला पाठींबा आहे .अशी माहिती  डॉ. अजित नवले यांनी  दिली. तसेच  अकोले तालुक्यातील इंदुरी गावात दूधाचे गावकऱ्यांनी मोफत वाटप केले. स्वाभिमानीचे दूध आंदोलन नांदेड जिल्ह्यात सुरू झाले आहे. पार्डी व मालेगाव जवळ (ता.अर्धापुर) शिवामृत दूध व मदर डेअरी वाहतूक करणा-या वाहनाच्या ड्रायव्हर आणि क्लिनर यांनाहि आंदोलनात सहभागी करून घेतले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कुरुंदवाड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक घालून आंदोलनास रात्री १२ वाजता प्रारंभ झाला असून  जयसिंगपुरात टँकरवर दगडफेकीनंतर पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. पोलीस कारवाईच्या शक्यतेने अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचे मोबाईल बंद आहेत.  सोलापूर मध्ये  रिधोरे (ता माढा) येथे नेचर दुधच्या व्हॅन मधील दूधाच्या पिशव्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री रोडवर फेकुन दिल्या.