Plum Benefits | आलू बुखारा आहे आरोग्यासाठी वरदान, जाणून घ्या याचे 5 जबरदस्त फायदे…!

पोलीसनामा ऑनलाईन – आलू बुखारा हे फळ शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते (Plum Benefits). याला अनेकजण प्लम म्हणून सुद्धा ओळखतात. हेल्दी फळांच्या यादीत या फळाचा समावेश होतो. या फळाच्या सेवनाने तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच आलू बुखारा च्या सेवनाने आपल्याला अनेक फायदे होतात. जाणून घ्या आलू बुखाराचे काही फायदे (Plum Benefits)-

  1. भरपूर पोषकतत्वे असतात (Contains Lots Of Nutrients)

प्लममध्ये पोषक तत्वांची कमतरता नसते. आपण प्लम खाल्लं, तर शरीराला व्हिटॅमिन सी (Vitamin C), व्हिटॅमिन ए (Vitamin A) आणि फायबरसारखे (Fiber) भरपूर पोषक तत्व मिळतात. हे पोषक त्तत्व आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. याशिवाय यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराला कर्करोग (Cancer) आणि इतर आजारांपासून वाचवण्यास मदत करतात.

  1. हृदयाचे आरोग्य सुधारते (Improves Heart Health)

भारतात हृदयरुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, अशा परिस्थितीत आपण सतर्क राहायला पाहिजे. यासाठी आपण आपल्या रोजच्या आहारात मनुकांचा समावेश करू शकतो. यामध्ये पोटॅशियम (Potassium) आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळतात. हे हृदयाच्या आरोग्यासाठी (Heart Health) चांगले असतात. या पोषक तत्वांचा मदतीने रक्तदाब नियंत्रित (Helps To Control BP) ठेवण्यास मदत होते.

  1. वजन कमी होते (Weight Loss)

प्लममध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. फायबर वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
भूक कमी करून वजन कमी करणे आणि शरीराची देखभाल करण्यास फायबरची मदत होऊ शकते.
तसेच तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमच्या रोजच्या आहारात प्लम्सचा समावेश करावा.
त्यामुळे पोट (Stomach Fats) आणि कंबरेची चरबी (Waist Fats) कमी करता येते.

  1. त्वचेसाठी फायदेशीर (Beneficial For Skin)

प्लममध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेसाठी फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी जंतून (Germs) सोबत लढून त्वचा
निरोगी ठेवण्यास मदत होते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स (Anti-Oxidant) रोगांशी लढून आपले संरक्षण करतात.

  1. मानसिक आरोग्यासाठी उपयोगी (Useful For Mental Health)

प्लममध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम शारीरिक आणि मानसिक तणाव (Helps To Decresase Mental Stress)
कमी करण्यास मदत करतात. यामुळे ताण-तणाव आणि नैराश्य दूर होण्यास मदत होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad On Ajit Pawar | शरद पवारांना संपवण्याची त्यांनी सुपारी घेतलीय, कालपर्यंत दैवत…, आव्हाडांचा अजित पवारांवर थेट आरोप

Pune Crime News | पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक

Shiv Sena Thackeray Group | शिवसेना ठाकरे गटाचा मोदी सरकारवर निशाणा, ”मतदान आटोपताच दरवाढ… ही मोदी सरकारची हातचलाखी”

Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा