PM Awas Rules | ‘पीएम आवास’चे नियम बदलले : करू नका ही चूक अन्यथा योजनेच्या लाभापासून राहाल वंचित

नवी दिल्ली : PM Awas Rules | पीएम आवास योजनेंतर्गत जर तुम्हाला सुद्धा घराचे वाटप करण्यात आले असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी असू शकते. पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये (PM Awas Rules) बदल करण्यात आला आहे. या अंतर्गत पाच वर्षापर्यंत तुम्हाला या घरात राहणे अनिवार्य आहे. जर तुम्ही यामध्ये राहात नसाल तर वाटप रद्द केले जाऊ शकते.

 

जाणून घ्या काय झाला आहे बदल

या योजनेच्या अंतर्गत सध्या ज्या घरांचे रजिस्टर्ड अ‍ॅग्रीमेंट टू लीज करून दिले जात आहेत किंवा जे लोक हे अ‍ॅग्रीमेंट भविष्यात करतील ते रजिस्ट्री नाहीत. जर तुम्ही पाच वर्षापर्यंत या घराचा वापर करत असाल किंवा केला असेल तरच हे घर तुमच्या नावावर रजिस्टर्ड होईल.

 

जर तुम्ही पाच वर्षापर्यंत या घराचा वापर केला नसेल तर तुम्हाला या योजनेतून (PM Awas Rules) वंचित करण्यात येईल.
तसेच तुमचे विकास प्राधिकारणासोबत झालेले अ‍ॅग्रीमेंट सुद्धा रद्द केले जाईल.
यानंतर तुम्ही जमा केलेली रक्कम सुद्धा परत दिली जाणार नाही.
यामुळे योजनेतील गडबड बंद होईल.

 

पाच वर्षानंतर सुद्धा लीजवर राहील घर

याशिवाय या नियमानुसार कधीही शहरी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (pm awas yojana) बनवलेले फ्लॅट फ्री होल्ड होणार नाहीत.
पाच वर्षानंतर सुद्धा लोकांना लीजवरच घरे दिली जातील.
या अंतर्गत जे लोक पंतप्रधान आवास योजनेतील घर भाड्याने देत होते, ते आता असे करू शकणार नाहीत.

 

मृत्यूनंतर काय होणार?

जर एखाद्या लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर अशा स्थितीत नियमानुसार, कुटुंबातील सदस्याला लीजवर घर हस्तांतरीत केले जाते
आणि विकास प्राधिकारणाकडून कोणतेही अ‍ॅग्रीमेंट केले जात नाही. मात्र 5 वर्षापर्यंत घराचा वापर करावा लागेल. यानंतर घरांचे लीज सुरळीत केले जाते.

 

Web Title :- PM Awas Rules | changed rule under pm awas do not make such mistake or else you will be deprived of the benefits of the scheme pm awas yojana marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा