इम्रान खान यांनी दिला पाकिस्तानी नागरिकांना ‘हा’ अल्टिमेटम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर बसल्यानंतर आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानला सावरण्यासाठी इम्रान खान अनेक प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या संरक्षण बजेटमध्ये देखील कपात केली होती. त्याचबरोबर सर्व पाकिस्तानी नागरिकांना आयकर वेळेवर भरण्याचे आवाहन केलं होते. आतादेखील त्यांनी तशाच प्रकारचे आवाहन केले आहे. मात्र यावेळी त्यांनी जरा कडक पद्धत अवलंबली आहे. यासाठी त्यांनी पाकिस्तानी नागरिकांना विशिष्ट कालावधी दिला आहे.

पाकिस्तान सरकार या आठवड्यात आपले केंद्रीय बजेट सादर करणार असून त्याआधी लोकांनी आपली बेनामी संपत्ती घोषित करून राष्ट्राच्या प्रगतीत हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. पाकिस्तान सरकारने घेतलेलं ६ कोटी अरब डॉलरच्या कर्जापायी त्यांचे मोठ्या प्रमाणात पैसे हे व्याज देण्यासाठी खर्च होत आहेत. त्यामुळे राष्ट्र उभारणीसाठी त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत.

त्यामुळे इम्रान खान आपल्या करसंकलनात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी नागरिकांना ३० जून हि शेवटची तारीख दिली आहे. या तारखेपर्यंत नागरिकांनी आपल्या बेनामी संपत्तीची घोषणा करावी. त्याचबरोबर या सरकारकडे तुमच्याविषयीची सर्व माहिती आहे, जी मागील कोणत्याही सरकारकडे नव्हती, असेदेखील ते यावेळी म्हणाले.

दरम्यान,आता या प्रकारची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानी नागरिक पंतप्रधान इम्रान खान यांना किती चांगले सहकार्य करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका

केसांच्या समस्या समूळ नष्ट करा ; ‘हे’ आहेत उपाय

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवायच्या आहेत ? घरीच बनवा अँटी एजिंग फेसपॅक

केसांसह त्वचेसाठीही आवळा गुणकारी ; रसाने त्वचा होईल गोरी