PM Kisan : 2000 रुपयांचा 8 वा हप्ता हवा तर लवकर करा रजिस्ट्रेशन, जाणून घ्या प्रोसेस

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – प्रधानमंत्री किसान योजनेचा आता पुढील हप्ता सरकार एप्रिल ते जुलैदरम्यान कोणत्याही वेळी पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करणार आहे. जर तुम्ही सुद्धा शेतकरी असाल आणि आतापर्यंत या योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले नसेल तर तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. तुम्ही थोडा वेळ काढून या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करू शकता.

पीएम किसानसाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी रजिस्ट्रेशनची प्रकिया सोपी आहे. तुम्ही ग्रामसेवक किंवा स्थानीय कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये या योजनेसाठी अप्लाय करू शकता. याशिवाय तुम्ही स्वत: सुद्धा योजनेसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रोसेस जाणून घेवूयात.

1. PM Kisan च्या ऑफिशियल वेबसाईटवर जा.

2. आता Farmers Corner वर जा.

3. येथे New Farmer Registration च्या पर्यायावर क्लिक करा.

4. यानंतर आधार नंबर टाकावा लागेल. सोबतच कॅप्चा कोड टाकून राज्य निवडा आणि नंतर प्रोसेस पुढे न्यावी लागेल.

5. या फॉर्ममध्ये तुमची संपूर्ण व्यक्तिगत माहिती भरा.

6. सोबतच बँक अकाऊंटची माहिती आणि शेतीशी संबंधीत माहिती भरा. यानंतर फॉर्म सबमिट करा.

शेती करणारे सीए, वकील, डॉक्टर यांच्यासारखे प्रोफेशनल्स या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. इन्कम टॅक्स रिटर्न भरणारे आणि 10,000 रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन घेणारे या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.