PM Kisan योजनेसाठी घर बसल्या करता येणार eKYC; जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना महत्वाची माहिती देण्याच्या तयारीत आहे. होळीच्या सणानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत एप्रिल-जुलै साठी 11 व्या टप्प्यातील दोन हजार रूपये (Two Thousand Rupees) जमा केले जाणार आहेत. पण, दुसरे महत्वाचे म्हणजे ई – केवायसी (e-KYC) पूर्ण करणे आवश्यक आहे. पीएम किसान पोर्टलवर (PM Kisan Portal) ई – केवायसी सुरू केली. दरम्यान आता घर बसल्या मोबाइल किंवा लॅपटॉपवरूनही ई – केवायसी करू शकणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेणे महत्वाचे आहे. (PM Kisan)

 

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकारकडून (Central Government) दरवर्षी 2 हजार प्रमाणे तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये थेट पाठविले जातात. आतापर्यंत सरकारने 10 हप्ते जमा केले आहेत. आता शेतकऱ्यांनी 11 वा टप्पा मिळण्याची प्रतीक्षा आहे. पण, यावेळी पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल करण्यात आला. त्यासाठी शेतकऱ्यांना ई – केवायसी करणे अनिवार्य आहे.

 

अशी आहे ‘ई – केवायसी’ प्रक्रिया –

प्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.

उजव्या बाजूला तुम्हाला eKYC लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.

आता तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.

आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर एंटर करा आणि ओटीपी टाका.

त्यानंतर सर्व काही व्यवस्थित झाले तर eKYC पूर्ण होईल, अन्यथा Invalid येईल.

असे झाल्यास तुमचा हप्ता उशीरा होऊ शकतो. तुम्ही ते आधार सेवा केंद्रावर दुरुस्त करून घेऊ शकता.

 

Web Title :- PM Kisan | make e kyc home for PM Kisan Samman Nidhi Yojana

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा