PM Kisan | पीएम किसान योजनेची रिफंड यादी जाहीर; तुमचे नाव आहे का? चेक करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 10 वा हप्ता (PM Kisan Sanman Nidhi Yojana) निघणार आहे, तर दुसरीकडे आता ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा (PM Kisan) चुकीचा फायदा घेतला आहे, त्यांच्याकडूनही रक्कम वसुली सुरू झाली आहे. या फसवणुकीबाबत सरकार आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. अपात्र शेतकऱ्यांना परतावा देण्यासाठी पीएम किसान योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांची यादी जारी करण्यात आली आहे. या यादीत ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत, त्यांना राज्यासह केंद्र सरकारला (Modi government) पैसे परत करावे लागणार आहेत.

PM Kisan अंतर्गत फसवणुकीचेही प्रकार –

विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी (State Government) केंद्र सरकार (Modi government) नेहमीच तत्पर असते. PM Kisan सन्मान निधी योजनेतील फसवणुकीचे मोठे प्रकरण समोर आल्यावर बिहार सरकारने या गंभीर समस्येवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. पीएम किसान योजनेंतर्गत स्वत:ची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी आता राज्य आणि केंद्र सरकारला पैसे परत करावे लागतील. झारखंड सरकारही असाच पुढाकार घेण्याच्या तयारीत आहे.

PM किसान हप्ता रिफंड यादी जाहीर –

शेतकर्‍यांना सोपे जावे यासाठी सरकारने डीबीटी वेबसाइट तयार केली आहे. ज्यात ज्या शेतकऱ्यांचे पैसे परत करायचे आहेत त्यांची नावे असतील. शेतकऱ्यांसाठी पात्रता निकष सरकारने ठरवून दिले आहेत. शहरी आणि शहराबाहेरील दोन्ही भागातील शेतकरी, लहान आणि सीमांत शेतकरी कुटुंबे आणि त्यांच्या नावे शेतीयोग्य जमीन असलेले शेतकरी ते या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र होते. यादीत शेतकऱ्यांची नावे आल्यास त्यांना प्रत्येक हप्त्याचे पैसे राज्य किंवा केंद्र सरकारला परत करावे लागतील.

Hardik Pandya | ‘माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली जातीय’ हार्दिक पांड्याचा ट्विटरद्वारे खुलासा; म्हणाला…

दरम्यान, एवढेच नाही तर नाव प्रसिद्ध केल्यानंतर शेतकरी हजर न झाल्यास कृषी भवनाच्या वतीने परताव्याची प्रक्रिया सुरू करण्याची नोटीस राज्याच्या नोडल अधिकाऱ्याकडून देण्यात येईल. जे शेतकरी वारंवार करदाते आहेत त्यांनाही त्यांचे पैसे राज्य सरकारला परत करावे लागतील आणि करदात्या शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी डीबीटी कृषीच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे.

पेमेंट रिटर्न लिस्टमध्ये तुमचे नाव तपासा –

pmkisan.gov.in या PM किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Sanman Nidhi Yojana) अधिकृत वेबसाइटला भेट द्या. मुख्यपृष्ठावर, अपात्र श्रेणी, शेतकऱ्याचे नाव, नोंदणी क्रमांक, लिंग, राज्य, ब्लॉक, जिल्हा, हप्त्याची रक्कम, परतावा मोड आणि बँक खाते तपशील प्रविष्ट करा.

तपशील प्रविष्ट केल्यानंतर सूची स्क्रीनवर दिसेल. आता यादी तपासा आणि तुमचे नाव उपलब्ध आहे की नाही ते पहा.
जर तुम्हाला तुमचे नाव दिसत असेल तर तुम्हाला योजनेअंतर्गत दिलेली रक्कम परत करा.
प्रत्येक राज्याने त्यांच्या शेतकऱ्यांसाठी स्वतःची स्वतंत्र वेबसाइट तयार केली आहे, जिथे ते त्यांची नावे तपासू शकतात.
दरम्यान dbtagriculture.bihar.gov.in ही बिहार राज्याची वेबसाइट आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना आपले नाव सहज शोधता येईल आणि वेळेचीही बचत होईल.

शेतकरी 10 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत –

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Sanman Nidhi Yojana) आता शेतकरी 10 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. आतापर्यंत या योजनेचा 9 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.
या योजनेंतर्गत केंद्र सरकार प्रत्येकी 2,000 रुपयांचे तीन हप्ते, म्हणजेच 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवते.
देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना थेट आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

हे देखील वाचा

MHADA | म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज

Chitra Wagh Letter To Ajit Pawar | राष्ट्रवादीला ‘सोडचिठ्ठी’ देऊन भाजपात गेलेल्या चित्रा वाघ यांचं अजित पवारांना पत्र, म्हणाल्या…

Hardik Pandya Watch | हार्दिक पांड्याकडून 5 कोटींची घड्याळं जप्त, मुंबई कस्टम विभागाकडून कारवाई

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  PM Kisan | pm kisan latest news pm kisan scheme issues refund list know here how to check the name in list

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update