PM Kisan | १२ कोटी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, या दिवशी येऊ शकतो पीएम किसानचा १३वा हप्ता!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या म्हणजेच पीएम किसान (PM Kisan) च्या १३व्या हप्त्याची (Pm Kisan 13th Installment) वाट पाहत असून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी येत आहे. लवकरच त्यांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. कारण, सरकार नवीन वर्षात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १३ वा हप्ता जारी करू शकते (PM Kisan Yojana 13th Installment).

 

कधी येणार १३वा हप्ता?
मीडिया रिपोर्टनुसार, पीएम किसान सन्मान निधीचा १३ वा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या कोणत्याही दिवशी रिलीज केला जाऊ शकतो. पुढील हप्ता १५ जानेवारीपूर्वी जारी केला जाऊ शकतो अशी माहिती आहे. पीएम किसान योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये ३ समान हप्त्यांमध्ये देते. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

शेतकऱ्यांनी त्वरित करावे eKYC
तुम्हालाही १३व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला ताबडतोब eKYC करावे लागेल.
यासाठी, सर्वप्रथम पीएम किसान पोर्टल किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन ईकेवायसी करा.
आता पीएम किसान पोर्टल किंवा कृषी विभागाकडून नोंदणीकृत शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी सतत मेसेज पाठवले जात आहेत,
जेणेकरून कोणताही पात्र शेतकरी १३ किंवा डिसेंबर-मार्चच्या हप्त्यापासून वंचित राहू नये.

शेतकऱ्यांचे ई-केवायसी लागू केले आहे आणि आधार पेमेंट ब्रिजद्वारे पेमेंट केले जात आहे.

 

Web Title :- PM Kisan | story pm kisan released 13th installment of 2000 rupees soon beneficiaries check details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Malaika Arora | अरहान खानला वाटते आई मलायकापेक्षा ‘ही’ व्यक्ती अधिक जवळची…

MP Supriya Sule | ‘धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी, केंद्राने स्पष्ट करावे’ – खा. सुप्रिया सुळे

Bank Holidays January 2023 | नवी वर्षाच्या पहिल्या महिन्यात बँकांना भरपूर सुट्ट्या, जाणून घ्या किती दिवस राहणार बंद