कोविडमुळे PM किसान योजनेचा हप्ता येण्यास उशीर ! जाणून घ्या केव्हा मिळणार पैसे?

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – या आर्थिक वर्षात पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता सुद्धा अजून जमा झालेला नाही. कोरोना संकटात जेव्हा शेतकर्‍यांना खरोखर पैशांची आवश्यकता असू शकते, तेव्हाच यासाठी उशीर होत आहे. काही रिपोर्टमध्ये सांगितले जात आहे की, कोरोना संकटाच्या कारणामुळे यावेळी हप्ता येण्यास उशीर होत आहे.

इंडियन एक्सप्रेसने कृषी मंत्रालयाच्या सूत्रांच्या संदर्भाने वृत्त दिले आहे की, यावेळी हप्ता मिळण्यास उशीर होऊ शकतो. सूत्रांनुसार, अजून राज्यांकडून डेटा अपडेट होणे आणि रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर (आरएफटी) वर हस्ताक्षर करण्यासारख्या अनेक प्रक्रिया पूर्ण होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. यासाठी एक आठवड्यांपर्यंत आता काहीही होऊ शकत नाही.

हे आहे कारण

सूत्रांचे म्हणणे आहे की, कोरोना संकटामुळे लाभार्थ्यांच्या व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेत उशीर होत आहे. याशिवाय ज्या आपात्र शेतकर्‍यांना अगोदर याचा लाभ मिळाला होता त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुमारे 9.5 कोटी शेतकर्‍यांना पहिला हप्ता म्हणून एकुण 19,000 कोटी रुपयांची रक्कम जारी केली जाईल.