PM Modi-Free Ration | PM मोदींकडून दिवाळी गिफ्ट! देशातील 80 कोटी गरीबांना आणखी 5 वर्षे मोफत रेशन देणार

नवी दिल्ली : PM Modi-Free Ration | मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या ५ राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. छत्तीसगढमध्ये ५०० रूपयात गॅस सिलेंडर देण्याचे भाजपाने जाहीरनाम्यात आश्वासन दिले आहे. आता अगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि दिवाळीचा मुहूर्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ८० कोटी गरीबांना आणखी ५ वर्षे मोफत रेशन देण्याची मोठी घोषणा केली आहे. (PM Modi-Free Ration)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, मी ठरवले आहे की भाजपा सरकार आता देशातील ८० कोटी गरीब लोकांना मोफत रेशन देण्याची योजना पुढील ५ वर्षांपर्यंत वाढवणार आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमी पवित्र निर्णय घेण्याचे बळ देतात. (PM Modi-Free Ration)

मोदी म्हणाले, काँग्रेसने गरिबांना फसवणुकीशिवाय काहीही दिले नाही. काँग्रेस गरिबांची कधीच कदर करत नाही. गोरगरिबांचे दु:ख त्यांना कधीच कळत नाही. त्यामुळे जोपर्यंत काँग्रेस केंद्र सरकारमध्ये राहिली तोपर्यंत गरिबांचे हक्काचे पैसे लुटून खात राहिली आणि आपल्या नेत्यांच्या तिजोरीत भरत राहिली.

मोदी म्हणाले, २०१४ मध्ये सरकार आल्यानंतर तुमच्या या मुलाने गरीब कल्याणाला सर्वात जास्त प्राधान्य दिले. आम्ही आमच्या गरीब बंधू-भगिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण केला की त्यांची गरिबी दूर केली जाऊ शकते.

मोदींनी दावा केला की, आमच्या सेवेच्या अवघ्या ५ वर्षात १३.५ कोटीहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले आहेत.
गरिबीतून बाहेर आलेले आज लाखो आशीर्वाद देत आहेत.
भाजपा सरकारने अत्यंत संयमाने आणि प्रामाणिकपणे काम केले.
मोदीसाठी देशातील सर्वात मोठी जात एकच आहे…गरीब. मोदी त्यांचा सेवक आहे, त्यांचा भाऊ आहे, त्यांचा मुलगा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, भाजपा सरकारने अशी व्यवस्था केली आहे की तुम्ही देशाच्या कोणत्याही
भागात गेलात तरी तुम्हाला मोफत रेशन मिळत राहील.
म्हणूनच वन नेशन-वन रेशन कार्डची सुविधा दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Metro News | पुण्यात १२ ठिकाणी महामेट्रो उभारणार वाहनतळ, मार्चमध्ये स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट मार्गावर धावणार मेट्रो

Maratha Reservation | मनोज जरांगेंची पहिली मागणी पूर्ण, मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर मंत्र्यांनी भेट घेऊन वाचून दाखवला