Coronavirus : ‘मन की बात’मध्ये PM मोदी म्हणाले – ‘सामाजिक अंतर, मास्क आणि व्हॅक्सीनच विजयाचा मार्ग’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बात (mann ki baat) मध्ये आपले मत मांडले. पीएम मोदी यांनी यावेळी म्हटले की, यास वादळात मरण पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांच्या प्रति मी संवेदना प्रकट करतो. लोकांनी मजबूतीने या संकटाशी सामना केला आहे. पीएम मोदी यांनी एनडीए सरकारचा 7 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबाबत विचार मांडले. ते म्हणाले, मला लोकांनी पत्र लिहिले की, मी मन की बात (mann ki baat) मध्ये आमच्या सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्यासंबंधीही बोलावे. या सात वर्षात जे काही साध्य झाले ती देशाची कामगिरी आहे.

मोदी म्हणाले, भारत आता कारस्थानांना थेट उत्तर देतो. पीएम मोदी म्हणाले, अनेक अशी कामे झाली आहेत ज्यामुळे कोट्यवधी लोकांना आनंद झाला आहे. मी या कोट्यवधी लोकांच्या आनंदात सहभागी आहे. देशाला पुढे नेण्यासाठी देशाच्या प्रत्येक नागरिकाने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी म्हटले की, पूर्वोत्तरपासून काश्मीरपर्यंत अनेक प्रकरणे शांततेने सोडवण्यात आली आहेत. आता येथे विकासाचा नवीन विश्वास जागृत झाला आहे. असे यासाठी शक्य झाले आहे कारण आम्ही या दरम्यान टीम इंडिया प्रमाणे काम केले आहे. जे काम दशकांपासून झाले नाही ते सात वर्षात झाले आहे.

 

घरबसल्या ‘या’ पध्दतीनं करा बॉडी पॉलिशिंग, पार्लर सारखा ग्लो मिळेल, जाणून घ्या

 

मोदी यांनी या दरम्यान म्हटले की, संकटाच्या या काळात डॉक्टर, नर्सेसने आपली चिंता सोडून लोकांची मदत केली. पीएम मोदी यांनी या दरम्यान ऑक्सीजन टँकरच्या सप्लाय करणार्‍या लष्कराचे कौतूक केले. लष्कराचे जवान जे काम करत आहेत ते रूटीन काम नाही. ही आपत्ती 100 वर्षानंतर आली आहे. मी त्यांना सलाम करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जौनपुरमध्ये राहणार्‍या दिनेश उपाध्याय यांच्याशी चर्चा केली. दिनेश उपाध्याय ऑक्सीजन टँकर चालवतात. संकटकाळात लोकांची मदत करत असलेले दिनेश उपाध्याय यांनी आपला अनुभव पीएम मोदी यांना सांगितला. पीएम मोदी यांनी म्हटले की, ही लढाई आपण जिंकू कारण दिनेश उपाध्याय यांच्यासारखे लाखो लोक या लढाईत सहभागी झाले आहेत.

पीएम मोदींनी ऑक्सीजन एक्सप्रेसच्या लोको पायलट शिरीषा यांच्याशी चर्चा केली. शिरीषा यांनी आपले अनुभव सांगितले. शिरीषा यांनी पीएम मोदी यांना सांगितले की, ती तिच्या वडीलांकडून प्रेरणा घेते. पीएम मोदी म्हणाले की, ही महिलांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कोरोनामुळे बिघडलेल्या स्थितीत आमच्या माता भगिनीसुद्धा ही लढाई लढत आहेत. मोदी यांनी यावेळी एयरफोर्समध्ये कार्यरत ग्रुप कॅप्टन ए.के. पटनायक यांच्याशी चर्चा केली. त्यांनी भारतीय लष्कराचे कौतूक केले. पीएम मोदी यांनी पटनायक यांची मुलगी आदितीशी सुद्धा चर्चा केली.

पीएम नरेंद्र मोदी यांनी या दरम्यान दिल्लीचे एक लॅब टेक्निशियन प्रकाश कांडपाल यांच्याशी त्यांच्या अनुभवावर चर्चा केली. या दरम्यान त्यांनी प्रकाश यांना म्हटले की तुम्ही दिवसभर लॅबमध्ये असता. लोकांना वाचवण्याचे काम करता. यावेळी त्यांनी लॅब टेक्निशियन्सचे कौतूक केले. त्यांनी म्हटले की, मेहनतीने हे लोक काम करत आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी लोकांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी म्हंटले देशाला असेच पुढे नेत रहा. सामाजिक अंतर, मास्क आणि व्हॅक्सीनच विजयाचा मार्ग आहे. मन की बातचा हा 77 वा भाग होतो.

 

Also Read This : 

1 जूनपासून EPFO चे नवे नियम लागू ! ‘ही’ प्रक्रिया पूर्ण करा; अन्यथा…

 

सर्दी-तापाचा Virus करू शकतो कोरोनावर मात, वैज्ञानिकांचा दावा

 

सद्गुरु सेवा प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने नायगाव येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

 

Weight loss : वजन कमी करण्यासाठी ‘जीम’ला जाऊ शकत नसाल तर OK; घरातील कामे करून देखील बर्न होतात कॅलरी, जाणून घ्या

 

कोरोना काळात जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर आवश्य ‘या’ Tips फॉलो करा, जाणून घ्या