नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरदारवर्गासाठी ही बातमी महत्वाची आहे. EPFO ने भविष्य निर्वाह निधी खातेधारकांसाठी असलेल्या नियमांत काही बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार आता कंपनीने प्रत्येक कर्मचार्याच्या खात्यास 1 जूनपूर्वी आधार कार्डाशी लिंक करणे आवश्यक आहे. जर तुम्ही खात आधार कार्डाशी लिंक केल नाही, तर तुमच्या खात्यात येणारे एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन थांबवल जाऊ शकते. त्यामुळे आपल खात त्वरित आधारशी लिंक करणे गरजेचे आहे. ईपीएफओने जारी केलेल्या अधिसूचनेत कर्मचाऱ्यांना नियुक्त करणाऱ्यांना विशेष जबाबदारी दिली आहे.
कानातील संसर्गाकडे दुर्लक्ष नका करू, ‘हे’ घरगुती उपाय देवू शकतात दिलासा
ईपीएफओने EPFO सोशल सिक्युरिटी कोड 2020 अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार ज्या खातेधारकांचे 1 जूननंतर खात आधार कार्डाशी लिंक नसेल तर त्यांचे इलेक्ट्रॉनिक चालान कम रिटर्न भरता येणार नाही. त्यामुळे पीएफ खात्यात कंपनीकडून जो शेअर दिला जातो तो मिळण्यास समस्या निर्माण होतात. कर्मचाऱ्यांना केवळ आपलाच शेअर खात्यात दिसणार आहे. या नियमांतर्गत खातेधारकांचा UAN देखील आधार व्हेरिफाईड असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमच खात आधार कार्डाशी लिंक करून घ्या. त्यानंतर UAN देखील व्हेरिफाय करून घ्या. यामुळे कंपनीकडून मिळणाऱ्या त्यांच्या शेअरमध्ये कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल आणि त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये ईकेव्हायसीमध्ये जावे लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी तुमचे आधार कार्डशी UAN शी लिंक करा. ही प्रक्रिया तुम्ही ओटीपी प्रोसेसद्वारे पूर्ण करता येणार आहे.
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु
लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या