PM Modi meets Pope Francis | तब्बल 22 वर्षानंतर भारताच्या पंतप्रधानांची पोप फ्रान्सिस यांच्याशी बैठक, दिलं भारत भेटीच निमंत्रण

इटली : वृत्तसंस्था –  PM Modi meets Pope Francis | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवारी) कॅथोलिक ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च नेते पोप फ्रान्सिस (PM Modi meets Pope Francis) यांची भेट घेतली आहे. मोदींनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलं आहे. पोप फ्रान्सिस यांनी हे निमंत्रण स्वीकारल्यास त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. असं सुत्राकडून सांगण्यात आलं आहे. मोदी आणि पोप फ्रान्सिस दोघांत 20 मिनिटांची बैठक होणार होती. मात्र जवळपास तासभर चर्चा चालली. तब्बल 22 वर्षानंतर भारताच्या पंतप्रधानांनी पोप फ्रांसिस यांची भेट घेऊन बैठकीत चर्चा केली आहे.

 

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांनी गरिबी निर्मूलन आणि हवामान बदल रोखण्यासारख्या उपायांवर चर्चा केल्याचे समजते.
दरम्यान, मोदी यांनी व्हॅटिकन येथे पोप फ्रान्सिस यांच्यासोबत झालेल्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.
तसेच, पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली.
त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली आणि त्यांना भारत भेटीसाठी आमंत्रित केलं.
त्यापूर्वी पंतप्रधान मोदी पोप यांची वैयक्तिक भेट घेतील आणि काही वेळाने शिष्टमंडळ स्तरावर चर्चा होईल.
असं भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला (Foreign Secretary Harshvardhan Shringala) यांनी सांगितलं होतं.

व्हॅटिकनने चर्चेसाठी कोणताही अजेंडा निश्चित केलेला नाही. माझा विश्वास आहे की अशी परंपरा आहे की जेव्हा परम आदरणीय (पोप)
यांच्याशी चर्चा केली जाते तेव्हा कोणताही अजेंडा नसतो आणि आम्ही त्याचा आदर करतो.
मला खात्री आहे की या काळात आपण सर्वसाधारणपणे जागतिक परिस्थिती आणि आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर चर्चेत सहभागी होऊ. असं श्रृंगला म्हणाले.

 

Web Title : PM Modi meets Pope Francis | pm narendra modi met pope francis in vatican city in a first ever one to one meeting check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Amravati Crime | फाइलमागे 5 हजार रुपयांची मागणी; अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर ऑडिओ क्लिपने उडाली खळबळ

MP Sanjay Raut | ‘आम्ही काही पेल्याबिल्यात पित नाही, आमच्याकडे पेल्यातील वादळं येत नाहीत, जी…’

Jan Dhan Accounts | खुशखबर ! SBI च्या ‘या’ ग्राहकांना मोफत मिळताहेत 2 लाख रूपये, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?