PM Modi | पीएम मोदी सध्या एकवेळ भोजन करत आहेत, स्वत:च सांगितले कारण; पहा व्हिडिओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) नेहमी आपल्या नियमांमुळे सुद्धा चर्चेत असतात. ते नवरात्रीत (Navratri) 9 दिवस उपवास करतात, हे यापूर्वी सुद्धा समोर आले आहे. इतके की त्यांनी अमेरिकेच्या दौर्‍यात सुद्धा नवरात्रीचा उपवास ठेवला होता. मात्र, पीएम मोदी (PM Modi) यांच्या बाबत अशीच आणखी एक गोष्ट समोर आली आहे.

पीएम मोदी सध्या एकवेळ जेवत आहेत. हे ऐकून तुम्हीही हैराण व्हाल, परंतु पंतप्रधानांनी स्वता याबाबत खुलासा केला आहे. पीएम मोदींनी ही गोष्ट टोकियो आलम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणार्‍या नीरज चोपडा (Tokyo Olympics gold medalist Neeraj Chopra) सोबत चर्चा करताना सांगितली.

सध्या चतुर्मास (Chaturmas) सुरू आहे. हिंदू धर्मानुसार चातुर्मासात अनेक प्रकारच्या वस्तू जसे की, दही, पालेभाज्या, डाळ इत्यादी खात नाहीत. तर, हवामानाची अनुकूलता नसल्याने असे करण्यास सांगितले जाते. या काळात एकवेळ भोजन केले पाहिजे. पीएम नरेंद्र मोदी सुद्धा अशाच लोकांपैकी आहेत जे चातुर्मासात एकच वेळ जेवण जेवतात.

नीरज चोपडा सोबतच्या भेटीत केला खुलासा
पीएम मोदी यांनी सोमवारी ऑलम्पिकमध्ये मेडल जिंकणार्‍या खेळाडूंसोबत पंतप्रधान निवासस्थानी भेट घेतली होती. त्याचे अनेक व्हिडिओ आता समोर आले आहेत. या मुलाखतीदरम्यान त्यांनी नीरज चोपडा (Neeraj Chopra) ला त्याच्या आवडीचा चूरमा (churma) खाऊ घातला.

नीरज चोपडाने चूरमा घेतला तेव्हा त्याने पीएम मोदी यांना सुद्धा खाण्याची विनंती केली.
यावर पीएम मोदी म्हणाले, सध्या मी एकच वेळ जेवत आहे.
सध्या चातुर्मास आहे आणि अशावेळी एकच वेळ जेवण करतो.
माझ्याबाबतीत नियमांचे थोडे बंधन आहे.

Web Title :- PM Modi | pm narendra modi eating food only one time these days due to chaturmas watch video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे पोलिस आयुक्तालयाच्या गेटवर पेटवून घेतलेल्याचा मृत्यू

 Overdraft Facility | खात्यात Zero Balance, तरीसुद्धा काढू शकता Salary च्या तीनपट पैसे! जाणून घ्या काय आहे बँकांची ‘ही’ विशेष सुविधा

Pune Crime | फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने पुण्यात अनेकांची फसवणूक; आकाश मोहिते, संभाजी निवंगुणे व पोपट निवंगुणे यांना अटक, जाणून घ्या प्रकरण