PM Modi | पंतप्रधान मोदींनी UNSC मध्ये सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी जगाला सांगितली 5 तत्त्वे; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद मोदी (PM Modi) यांनी सोमवारी म्हटले की, सागरी वादावर तोडगा शांततापूर्ण आणि अंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारावर निघाला पाहिजे. त्यांनी समुद्र संपूर्ण जगासाठी समान वारसा असल्याचे सांगत म्हटले की, सागरी मार्ग अंतरराष्ट्रीय व्यापाराची जीवनरेषा आहेत, परंतु आजपर्यंत त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ते संयुक्त राष्ट्र परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीत ‘सागरी सुरक्षा वाढवणे’ विषयावर PM Modi बोलत होते.

त्यांनी पुढे म्हटले, आज दहशतवादी घटनांसाठी आणि समुद्री चाच्यांकडून सागरी मार्गांचा वापर होत आहे, यासाठी आम्ही या विषयाला सुरक्षा परिषदेकडे घेऊन आला आहोत. पीएम मोदी यांनी समुद्रातून उत्पन्न होणार्‍या नैसर्गिक आपत्तींमुळे येणार्‍या आव्हानांचा मिळून सामना करण्यावर जोर देत म्हटले की, आम्हाला या विषयावर प्रादेशिक सहकार्य वाढवण्याची आवश्यकता आहे आणि भारताने या दिशेने अनेक पावले उचलली आहेत. यावेळी पीएम मोदी यांनी पाच तत्व सांगितली, ती पुढील प्रमाणे…

– पहिले तत्त्व :
आपल्याला सागरी व्यापारातील अडथळे दूर करायला पाहिजेत. आपल्या सर्वांची समृद्धी सागरी व्यापारावर अवलंबून आहे. यामध्ये येणार्‍या अडचणी संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी आव्हान होऊ शकतात.

– दूसरे तत्त्व :
सागरी वादावर शांतता आणि अंतरराष्ट्रीय कायद्यावर आधारीत तोडगा काढला पाहिजे. आपसातील विश्वासासाठी हे अतिआवश्यक आहे. याच माध्यमातून आपण जागतिक शांतता आणि स्थिरता कायम ठेवू शकतो.

– तिसरे तत्त्व :
आपल्याला नैसर्गिक आपत्ती आणि समुद्री चाचांकडून निर्माण करण्यात आलेल्या समुद्री धोक्यांचा एकत्रितपणे सामना केला पाहिजे.
या विषयावर प्रादेशिक सहकार्य वाढवण्यासाठी भारताने अनेक पावले उचलली आहेत.
चक्रीवादळ, सुनामी आणि प्रदूषणासंबंधी सागरी आपत्तींमध्ये आम्ही फर्स्ट रिस्पाँडर राहिलो आहोत.

चौथे तत्त्व :
आपल्याला सागरी वातावरण आणि सागरी संसाधनांचे जतन करावे लागेल.
समुद्रांचा जलवायुवर थेट परिणाम होतो.
यासाठी आपल्याला आपल्या सागरी वातावरणाला प्लास्टिक आणि तेलाच्या गळतीसारख्या प्रदूषणापासून मुक्त ठेवावे लागेल.

पाचवे तत्त्व :
आपल्याला जबाबदार सागरी संपर्काला प्रोत्साहन दिले पाहिजे.
हे स्पष्ट आहे की सागरी व्यापार वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती आवश्यक आहे.
परंतु अशा पायाभूत सुविधांशी संबंधीत योजनांच्या विकासात देशांची वित्तीय स्थिरता आणि क्षमता लक्षात घ्यावी लागेल.

Web Title :- PM Modi | sea is our shared resource pm narendra modi unsc high level open debate on enhancing maritime security

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Weight Loss with Owa | ‘या’ जबरदस्त ड्रिंकमुळे काही आठवड्यातच कमी होईल वजन, गायब होईल चरबी

Rama Mahto | सापाने दंश केल्याने संतापलेल्या जेष्ठाने सापाला चावा घेऊन केले ठार, म्हणाला – तुझी हिंमत कशी झाली…

Rupee Bank | रुपी बँकेच्या ठेवीदारांना मुदत ठेवीचे पैसे 90 दिवसात मिळतील, केंद्रीय अर्थमंत्र्यांची ग्वाही